दखल न्युज चिखलदरा
तालुका प्रतीनीधी
अबोदनगो चव्हाण
चिखलदरा-:
आज दि. १८/१०/२०२२ रोज मंगळवारला शासकीय आश्रमशाळा डोमा येथे काटकुंभ केंद्राची शिक्षण परिषद वेळ सकाळी ११.०० वाजता आयोजीत करण्यात आली होती. या शैक्षणिक संवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्राचे के.प्र. श्री नामदेव अमोदे सर, प्रमुख अतिथी म्हणूण आश्रम शाळा डोमा चे प्राचार्य श्री चौधरी सर आणि जि. प. शाळा डोमाचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री सुरेंद्र अर्डक सर होते. कार्यक्रमाची सुरुवात पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.
शिक्षण परिषद शैक्षणिक संवाद कार्यकमाचे प्रास्ताविक श्री सुरेंद्र अर्डक सर यांनी केले. अर्डक सरांनी ज्ञानरचनावाद या विषयाची आठवण करून दिली. श्री चौधरी सर यांनी कार्यशाळेची उपयुक्तता विषद केली. केंद्रप्रमुख श्री अमोदे सर यांनी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा शिक्षकांबाबत असलेला दृष्टीकोन “शिक्षण-पर्व” चे महत्व विषद केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणूण जि.प. शाळा बामादेही चे विषय शिक्षक श्री अरविंद भोपळे सर यांनी वर्ग ६ वी च्या विद्यार्थ्यांवर “सायकल म्हणते, मी आहे ना!” या गद्य पाठावर आदर्श नमुना पाठ घेतला. उपस्थित शिक्षकांना त्या पाठातील तृटी, बलस्थाने व उपयुक्तता विचारली. त्यानंतर पुन्हा श्री भोपळे सर यांनीच “नाविण्यपूर्ण अध्यापनशास्त्र” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्ष केंद्र प्रमुख श्री अमोदे सर यांनी मार्गदर्शन करून राष्ट्रवंदनेने शिक्षण परिषद शैक्षणिक संवाद या कार्यक्रमाची सांगता झाली.