पारशिवनी:- ग्रामिण भागा तिल शहरातील गरिब होतकरू व शिक्षित मुला मुलींना पोलीस भर्तिपुर्व व स्पर्धा परीक्षांची तयारी तेही कसलाही मोबदला न पुर्ण करण्यासाठी पारशिवनी शहरातील पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक ज्ञानबां पळनाटे आपले कर्तव्य इमानेइतबारे बजावंत मिळणाऱ्या वेळेला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. ज्ञानोबांच्या ज्ञानदानाने गरिब होतकरू मुलांचे पोलीस होण्याचे स्वप्न व ईतर स्पर्धा परीक्षा देण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. स्पर्धा परीक्षा शिकवणी वर्गात पैसा अभावी व आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने पोलीस भर्तिपुर्व व स्पर्धा परीक्षांची तयारी न करू शकणार्या शेतकरी व मोल मजूरवर्गातील शिक्षीत मुलांना व मलीना आपल्या स्वप्नाला भरारी देणे अवघड होते. अशा मुलांना व मलीना स्वप्न शाकार करण्यासाठी ज्ञानबां च्या सेवाभावी वृत्तीने ज्ञानेश्वरच मिळाला असल्याने वंचित बहुजनांची पोलीस व ईतर नौकरीत जाण्याची स्वप्ने आता पुर्ण होईल. ज्ञानोबा पळनाटे यांच्या सेवाभावी वृत्तीची दखल घेऊन माजी मंत्री सुनील बाबू केदार व राजेंद्रजी मुळक हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. हे ज्ञानोबां पळनाटे आहेत तरी कोण? ज्ञानोबा पळनाटे हे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून पारशिवनी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर ३ वर्षा पासुन कार्यरत आहेत. त्यांनी हालाकीच्या परिस्तिथी वर मात करूण त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय गाठले. पण गरीबीची झळ सोसून आपलेच जिवन न फुलवता समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना गरिबीमुळे व योग्य मार्गदर्शना अभावी स्पर्धा परीक्षा पासून वंचित राहावे लागते. आपण सुध्दा समाजाचे ऋण फेडण्यासाठी आज सक्षम आहे व त्यासाठी आपण आपले कर्तव्य पार पाडून समाजातील गरीब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना पोलीस भर्तिपुर्व व स्पर्धा परीक्षांची तयारी तयारी कसलाही मोबदला न घेता गेल्या तीन वर्षांपासून सतत मार्गदर्शन करून व मैदानी व शारीरिक क्षमता. बौद्धिक क्षमता. स्पर्धा परीक्षा अभ्यास पूर्ण करण्यास आरंभ केला. व ४०ते ५० मुला. मुलींना मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन प्रति वर्षी तयार करणारे ज्ञानोबां या मुला. मुलीसाठी ज्ञानेश्वरच प्रगटले. बहुतेक मले मली पोलीस व ईतर स्पर्धा परीक्षा देऊन आपल्या भविष्याची सुंदर सुरुवात करून जिवन फुलवत आहे. ज्ञानोबांच्या मार्गदर्शना करिता पारशिवनी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील व शहरातील विद्यार्थ्री मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन प्रशिक्षणाचा लाभ कसलाही मोबदला न देता घेत आहे. हे विशेष. ज्ञानोबांच्या ज्ञानदानाने आदिवासी क्षेत्रातील व शहरासह. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना आपले स्वप्ने पुर्ण करण्याची सुवर्ण संधी मिळाली. व आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील शिक्षित होतकरू विद्यार्थ्यांना देऊन ज्ञानोबां. ज्ञानेश्वर झाला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना माजी मंत्री सुनील बाबू केदार व राजेंद्रजी मुळक हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या सेवाभावी सामाजिक उपक्रमास मानाचा जय भारत.