चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
लाखनी:-
येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर लाखनी व साकोलीचे मागील 18 वर्षांपासून कार्यरत असणारे व निसर्गाची निस्वार्थ अहर्निश सेवा करणारे सर्पमित्र व निसर्गमित्र यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी,जिल्हा वनअधिकारी राहुल गवई,जिल्हा पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, वनक्षेत्राधिकारी विवेक राजूरकर यांचे हस्ते वन्यजीवसप्ताहाच्या निमित्ताने प्रमाणपत्र,ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांच्या पुढाकाराने भंडारा -गोंदिया जिल्ह्यात सर्वप्रथम सर्पमित्र पथकाची स्थापना 18 वर्षांपूर्वी केली. ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब च्या या सर्पमित्र पथकामुळेच शासकीय नियमांचे पालन करून शास्त्रीय पद्धतीने सर्परक्षणाकरिता तसेच सापांची सुरक्षित सुटका करून जनतेच्या मनातील भीती व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जागृती मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक लोहित मतानी व उपअधीक्षक अनिकेत भारती यांचे हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र व मेडल देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.सोबतच भंडारा गोंदिया जिल्ह्यात सुरवातीच्या काळात सर्वत्र सापांची सुरक्षित सुटका करणाऱ्या साकोलीचे सर्पमित्र यशपाल कापगते, कैलाश वलथरे,गुणवंत जिभकाटे,प्रफुल्ल वाघमारे,मनीष भैसारे,लाखनीचे सर्पमित्र पंकज भिवगडे,मयुर गायधने,गगन पाल,धनंजय कापगते या वरिष्ठ मार्गदर्शक सर्पमित्रांचा विशेष सत्कार जिल्हा अधिक्षक लोहित मतानी यांचे हस्ते करण्यात आला. यामधील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे सहा सर्पमित्र -निसर्गमित्र यात पंकज भिवगडे, मयुर गायधने, यशपाल कापगते,धनंजय कापगते ,दर्वेश दिघोरे व साकोलीचा युवराज बोबडे या सहा जणांची नुकतीच ‘द रिअल हिरो अवॉर्ड’ने राज्यस्तरीय सत्काराकरिता निवड झाली व त्यांना हिंगोली येथे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्पअभ्यासक पुण्याचे निलीमकुमार खैरे यांचे हस्ते त्यांना ट्रॉफी- प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते त्याबद्दल त्यांचे अभिनंदन सुद्धा याठिकाणी करण्यात आले. मागील पाच सहा वर्षांपासून साकोली- लाखनी तालुक्यात अविरत स्नेक रेस्क्यू सेवा देणारे अत्यंत कार्यरत असे सर्पमित्र साकोलीचे युवराज बोबडे, रोशन बागडे,सौरभ राऊत,गोविंद धुर्वे, अथर्व राऊत साकोली,बाळकृष्ण मेश्राम सावरबंध, यश तिडके एकोडी,सागर चचाणे साकोली,शैलेश गायधने ,प्रज्वल मेश्राम परसटोला, सुनील बोधनकर विर्सी,तसेच लाखनी तालुक्याचे सलाम बेग,दर्वेश दिघोरे पोहरा,जेवनाळा पालांदूर क्षेत्रातील समित हेमने,वैभव हेमने,आदेश गोंदोळे,सुहास हेमने जेवनाळा, ग्रीनफ्रेंड्सचे सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे,खेमराज हुमे पिंपळगाव, नितीन निर्वाण,योगेश वंजारी लाखनी,रेंगेपार कोहळीचे नितीन पोवनकर ,गौरव बोरकर, दीपक किरणापुरे धानला, वैभव कांबळे सेलोटी, पवन तिवाडे पिंपळगाव यांचा सुद्धा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या अहर्निश सर्पसेवेबद्दल तसेच निसर्गसेवेबद्दल गौरविण्यात आले.
वरील सर्पमित्रांनी केवळ हजारोंच्या संख्येने सापांचाच जीव वाचविला असे नाही तर अनेक सर्पदंश झालेल्यांना व्यक्तींना मृत्यूच्या दारातून बाहेर आणून त्यांना जीवदान दिले. सोबतच शेकडो जंगली प्राणी,जखमी पक्षी यांना सुद्धा वाचवुन जीवदान देण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे. जिल्हा पोलीस कार्यालय पोलीस यूथ फोरम व वनविभागातर्फे यासर्वांच्या सन्मानपूर्वक सत्कारांबद्दल ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने अध्यक्ष अशोक वैद्य, पदाधिकारी दिनकर कालेजवार,दिलिप भैसारे, मंगल खांडेकर, अशोक नंदेश्वर, शिवलाल निखाडे,रामकृष्ण गिर्हेपुंजे,नाना वाघाये,इंजि राजेश गायधनी,गुरूकुल आय. टी. आय.चे प्राचार्य खुशालचंद मेश्राम,रिटायर्ड सुभेदार मेजर ऋषि वंजारी,सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ मनोज आगलावे इत्यादीं अनेक निसर्गप्रेमी नागरिकांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भंडाराचे सर्पमित्र राज बघेल,हिमांशू साकुरे, मयुर गायधने लाखनी व भंडारा सर्पमित्र चमू यांनी जिल्हा पोलीस कार्यालयाच्या पोलीस यूथ फोरमच्या माध्यमातून व जिल्हा वनविभाग भंडारा तसेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी यांचे सहकार्याने सत्कार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.