आंतरवासिता कक्षचे उदघाटन…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

       गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित,राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे आंतरवासीता कक्षाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांचे अध्यक्षतेखाली,महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रो.डॉ.प्रफुल्ल बनसोड यांचे हस्ते करण्यात आले. 

        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.हरेश गजभिये नोडल अधिकारी,आंतरवासीता कक्ष यांनी केले.प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतांना पुस्तकी ज्ञानासोबत व्यवसायिक कौशल्य आत्मसात करावे त्याकरिता महाविद्यालयातील आंतरवासिता कक्ष मदत करेल असे मत व्यक्त केले.

        कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजेश्वर रहांगडाले तर आभार डॉ.लक्षमन कामडी यांनी मानले.या कार्यक्रमाला मराठी विभाग प्रमुख डॉ. कार्तिक पाटील,प्रा.पितांबर पिसे,प्रा.आशुतोष पोपटे तसेच इतर प्राध्यापक व विध्यार्थी उपस्थित होते.