पोर्ला येथे शनिवारी शेकापचा कार्यकर्ता मेळावा…

ऋषी सहारे 

   संपादक

गडचिरोली :- गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या उमेदवार जयश्रीताई जराते यांच्या प्रचार – प्रसाराचे धोरण ठरविण्यासाठी वसा – पोर्ला जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पोर्ला येथे शनिवार दिनांक २१ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

           शेतकरी कामगार पक्षाच्या रस्ते/ महामार्ग बाधित शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांच्या हस्ते या कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सहउद्घाटक म्हणून जयश्रीताई जराते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेकापच्या राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई मोहनराव गुंड, अध्यक्ष म्हणून शेकाप आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते उपस्थित राहणार आहे.

             प्रमुख अतिथी म्हणून भाई शामसुंदर उराडे (मध्यवर्ती समिती सदस्य), भाई संजय दुधबळे (जिल्हा समिती सदस्य), डॉ. गुरुदास सेमस्कर (जिल्हा समिती सदस्य), भाई तुळशिदासजी भैसारे (जिल्हा समिती सदस्य), भाई क्रिष्णा नैताम (जिल्हा समिती सदस्य), कविता ठाकरे (जिल्हाध्यक्ष महिला आघाडी), गुड्डू हुलके (जिल्हाध्यक्ष युवक आघाडी), अभिलाषा मंडोगडे (जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आघाडी), भाई शोएब पटेल (जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी), भाई गोविंदा बाबनवाडे (जिल्हाध्यक्ष शेतकरी आघाडी), भाई पवित्र दास (जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी), भाई प्रभाकर गव्हारे (जिल्हाध्यक्ष महामार्ग बाधित शेतकरी आघाडी), भाई रामदास आलाम (जिल्हाध्यक्ष आदिवासी आघाडी), भाई डंबाजी भोयर (जिल्हाध्यक्ष भटके विमुक्त आघाडी), भाई शर्मीश वासनिक (जिल्हाध्यक्ष शिक्षक आघाडी) तसेच विशेष अतिथी म्हणून पोर्णिमाताई खेवले, पोर्णिमाताई शेंडे, हेमलताताई मुनघाटे, अप्सरा डोईजड (महिला आघाडी) विश्वनाथ पा. मशाखेत्री, तुळशिदास दाणे, गोपाल गेडाम (अध्यक्ष, जयगंगा मच्छिमार सहकारी संस्था, पोर्ला), प्रभाकर पा. डोईजड, सिद्धार्थ खंडारे, निवृत्त नायब तहसिलदार, (काटली), एकनाथ अंबादे, प्रभाकर शेंडे (वसा), मोरेश्वर बांबोळे (नगरी), जीवन गेडाम, ग्रा.प.सदस्य (गोगाव), सौ. किरणताई मेश्राम माजी ग्रा.प. सदस्य (अडपल्ली) प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

            वसा – पोर्ला जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवेंद्र भोयर (काटली), यशवंत मुरकूटे, शालिक भोयर, रुषी कोल्हे (पोर्ला), हिराचंद कोडगले (नगरी), मार्कडी आवारी (नवरगाव), बाळकृष्ण मेश्राम (अडपल्ली), आत्माराम मुनघाटे (गोगाव), रवि कंकलवार (कुऱ्हाडी), कुमदेव गायकवाड (साखरा), शिवा ताटपल्लीवार (मोहझरी), ईश्वर गेडाम (चुरचूरा), काटली शाखेचे प्रकाश पा. डोईजड, विलास भोयर (गाव शाखा चिटणीस), कैलास शिंपी (खजिनदार), कामोद मुनघाटे, रेवनाथ मेश्राम (सहचिटणीस) अडपल्ली शाखेचे प्रकाश भोयर (शाखा चिटणीस), किसन टिंगूसले (खजिनदार), ईश्वर मंगर, सूमीत मानकर (सहचिटणीस) साखरा शाखेचे सचिन झरकर (खजिनदार), सुखदेव मानकर, किशोर दडमल (सहचिटणीस) मोहझरीचे डिकेश ठाकरे, रोशन भोयर, भास्कर कोल्हे, रोशन कांबळे (चुरचूरा), सुरेश भोयर (नवरगाव), नगरीचे शरद कोसमसिले, संगीता मुखरुदास चिंचोलकर, कल्पना गिरीधर डोईजड, धर्माजी रामटेके यांनी केले आहे.