ब्रेकिंग न्यूज… — गणपती विसर्जनासाठी गेलेल्या अनिकेत कुलकर्णीचा मृतदेह निरा नदीच्या पात्रातून काढला बाहेर..

      बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर तालुका प्रतिनिधी 

         इंदापूर येथील नीरा नदीपात्रात गणपती विसर्जनासाठी गेलेला अनिकेत कुलकर्णी 16 वयाचा विद्यार्थी पाण्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला.

       या प्रकाराची वेळीच दखल घेऊन इंदापूर तहसीलचे तहसीलदार जीवन बनसोडे व बावडा पोलीस स्टेशनचे एपीआय राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन या ठिकाणी स्थानिक लोकांच्या मदतीने व या ठिकाणचे मच्छीमार आणि होडीच्या साह्याने संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत तपास यंत्रणा चालू ठेवली होती.

      परंतु रात्र झाल्यामुळे सदर ठिकाणी तपास कार्य थांबवावे लागले व पुन्हा सकाळी दहा वाजता विजय शिवतारे एक्स नेव्ही,महाराष्ट्र अंडरवॉटर सर्विस पाणबुडीच्या साह्याने अनिकेत कुलकर्णी यांचा शोध घेण्यात आला.

       सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी बुडालेल्या अनिकेत कुलकर्णी या विद्यार्थ्यांचा मृतदेह हाती लागला व इंदापूर पोलीस स्टेशनचे पी.आय.सूर्यकांत कोकणे यांच्या सर्व टीमने मृतदेहाचा पंचनामा करून इंदापूर येथे शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यातसाठी पाठवले.

        इंदापूर पोलीस स्टेशनचे पी.आय.सूर्यकांत कोकणे यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की,सदर घटनाही दुर्दैवी असून घटना कशी घडली याचा पूर्ण तपास केला जाईल व त्याच्यामध्ये जो दोषी आढळेल त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणाला पाठीशी घातले जाणार नाही. 

      श्री.लक्ष्मी नरसिंहाच्या वेदपाठक शाळेतील विद्यार्थी अनिकेत विनायक कुलकर्णी हा गणपती विसर्जन करण्यासाठी निरा नदी पात्रात गेला आसताना पायऱ्यावरून पाय घसरून पाण्यात बुडाला.

       घटनास्थळी लगेच गावातील प्रमुख ग्रामस्थ व इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे,बावडा पोलीस स्टेशनचे एपी आय राऊत,तहसिल चे लिपिक दीपक पवार,सहित पोलिस यंत्रणा व मंडल अधिकारी मल्लाप्पा ढाणे,तलाठी पिसाळ भाऊसाहेब सर्व यंत्रणा सज्ज होऊन नदीपात्रातील शोध मोहीम ही कल्याण भंडलकर यांच्या कॅमेऱ्याच्या साह्याने शोध चालू होता.मंगळवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत शोध लागलेला नाही.

         शोध मोहीमे पसंगी अनिकेतच्या नातेवाईकांची तहसीलदार जीवन बनसोडे,बावडा पोलीस स्टेशनचे एपीआय राऊत,यांनी भेट घेऊन लवकरच पुढील

शोध घेण्यात येईल आसेही यावेळी सांगण्यात आले होते.

          निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील श्री लक्ष्मी नरसिंह वेदपाठ शाळेतील विद्यार्थी अनिकेत कुलकर्णी हा गुरु व विद्यार्थ्यां समवेत लक्ष्मी नरसिंहाच्या बाजूकडील नीरा नदी पात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी गेला आसता नदीकडेच्या पायऱ्यावरून अनिकेत कुलकर्णीचा पाय घसरून पाण्यात बुडाला ही घटना अतिशय दुर्दैवी घडली.यामुळे संपूर्ण नरसिंहपूर गावामध्ये दुःखमय वातावरण निर्माण झाले.

         इयत्ता नववीत शिक्षण घेत आसताना गेल्या दहा वर्षापूर्वी त्याचे वडील विनायक कुलकर्णी मुक्काम पोस्ट हाडोंगी तालुका भूम जिल्हा धाराशिव यांनी शाळा सोडून,,वेदायन विद्या अभ्यास करण्यासाठी नरसिंहपुर येथील श्री.लक्ष्मी नरसिंह वेद पाठशाळा या ठिकाणी विद्या शिकण्यासाठी पाठवलेला होता.

        वेदपाठ शाळेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत शामकांत देशपांडे यांनी गेली 20 वर्षापासून

शाळा काढलेली आहे.या शाळेमध्ये सध्या 30 विद्यार्थ्यांचा पट असून सर्वच विद्यार्थी वेधपाठ विद्या शिकत आहेत.

         तेव्हापासून या विद्यालयात आशा प्रकारचा कोणताही आनार्थ प्रकार घडलेला नव्हता.वेधशाळाही चांगली,अभ्यासही चांगला आहे. चांगले विद्यार्थी घडवायचे हीच या वेदपाठ शाळेची ओळख आहे. 

        परंतु दुर्दैवाने अनिकेत कुलकर्णी हा गणपती विसर्जन करण्यासाठी गेला आसताना नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली.