युवराज डोंगरे
उपसंपादक
गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन युवकांचा पूर्णा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना 17 सप्टेंबरला सायंकाली 5 वाजताच्या सुमारास घडली असुन दोन्ही मृतक ईसापूर या गावातील रहीवासी आहेत.या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
अमोल ईश्वरधर ठाकरे (44),मयूर गजानन ठाकरे (24) अशी मृतक युवकांची नावे आहेत.काल घरच्या गणपतीसह गावातील घरगूती गणपती एकत्र ट्रॅक्टर मध्यें एकत्रित करुन 10 ते 12 जण हे येलकी जवळील पूर्णा नदीवर गेले होते.
गणपती विसर्जन करीत असतांना अमोल व मयूर हे दोघेजण पूर्णा नदीच्या खोल पात्रात वाहुन गेले.यामुळे घटनास्थळी एकच खलबल उडाली.पोलिस व बचाव पथकास माहीती देण्यात आली.
मात्र रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही.आज (18)सप्टेंबरला नदीकाठाने शोध मोहीम राबविली असता मयूर ठाकरेचा मृतदेह हा घटनास्थलापासुन 3 किमी अंतरावर आढलला तर अमोल ठाकरेचा मृतदेह पूर्णा नदीपात्राच्या पुलाजवळील परीसरात आढलला.
ईश्वरधन हा ग्रा.पं.कर्मचारी होता तर मयूर हा अंजनगाव येथील सहयोग या खाजगी बाँकेत कार्यरत होता.