कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी…
पारशिवनी=आज (दि.18) तालुक्यातील भुलेवाडी येथील रहिवासी युवक सुरक्षीत ऊर्फ विक्की क्रिष्णा ठाकरे (वय 23) यांनी शेतशिवारात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली.
पालासावळी गावावरून उत्तरेस १० कि.मि.अंतरावर असलेल्या शेतशिवारात आंबाच्या झाडाला नायलोनदोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उडघडीत आल्याने खळबळ उडाली.
मृतकाचे वडील यानी पोलिस स्टेशन पारशिवनी येथे घटने संबंधाने सुचित केल्याने पोलीसानी घटनास्थळी येऊन आत्महत्या स्थितीचा पंचनामा करून मृतकाचा मृतदेह उत्तरिय तपासणी करिता ग्रामिण रुग्णालय पारशिवनी येथे आण्यात आले.
मृतकाचे वडील किष्णा ताराचंद ठावरे वय 59 वर्ष राहणार भुलेवाडी यानी पोलिस स्टेशनला तक्रार नोदवली आहे.वडीलांच्या तक्रारी वरून पोस्टे येथे मर्ग क्रमांन 35/23 अन्वये गुन्हा दाखल करून कलम १७४ जा.फो.नुसार पुढील तपास पो.नि.राहुल सोनवने याचे मार्गदर्शनात पोलिस पुढील तपास करित आहे.