प्रितम जनबंधु
संपादक
भंडारा :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवाड्याच्या पार्श्वभूमीवर 17 सप्टेंबर रोजी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून भव्य रक्तदान शिबिर व आयुष्यमान भारत कार्ड वितरित करून धन्यवाद मोदीजी हा कार्यक्रम घेण्यात आला.
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. त्यामुळे 17 सप्टेंबर ते गांधी जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबर या कालावधीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. सदर निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.
पंधरवड्यात विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. याच पार्श्वभूमीवर 17 सप्टेंबर रोजी भंडारा येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. समर्पण रक्तपेढीच्या चमूने रक्त संकलनाचे काम केले. यावेळी अनेक भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी रक्तदान केले. या शिबिराला उपस्थित राहत खासदार सुनील मेंढे यांनी रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले.
यावेळी सेवा पंधरवड्याचा एक भाग म्हणून भाजपा भंडारा शहराच्या वतीने धन्यवाद मोदीजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेले कार्ड लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. आयुष्यमान भारत आणि इतर विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी यावेळी मोदींचे धन्यवाद करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रकाश बाळबुधे, उल्हास फडके, संजय कुंभलकर, मंजिरीताई पनवेलकर, मुकेश थानथराटे, चैतन्य उमाळकर, अनुप ढोके, अबीद सिद्दिकी, महेंद्र निंबार्ते, निशिकांत ईलमे, हेमंत देशमुख, रुबी चड्डा, डिम्मु शेख, सचिन कुंभलकर, रामदास शहारे, कैलाश कुरंजेकर, सूर्यकांत इलमे, प्रशांत निंबोळकर, भूपेश तलमले, शैलेश मेश्राम, तुषार काळबांडे, अजय ब्राह्मणकर, शिव आजबले, कैलास तांडेकर, मनोज बोरकर, साधना त्रिवेदी, रोशनी पडोळे, आशा उईके, मधुरा मदनकर, मला बघमारे, श्रद्धा डोंगरे, अर्चना श्रीवास्तव, आकाश फाले, अमित बिसने, बंटी तांडेकर, प्रशांत पुरुषार्थी, अक्षय गिरडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.