डॉ. सतिशभाऊ वारजूकर यांनी केली पूर परस्थितीत नुकसान झालेल्या शेतीची पाहणी…

 

अरमान बरसागडे

तालुका प्रतिनिधी चिमूर 

           चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगांव जवळून वाहत असलेल्या वैनगंगा नदीला सततच्या मुसळधार पावसाने पाणी तुडुंब भरून वाहत आहे यामुळे पिंपळगांव व आजूबाजूच्या परिसरात पूर परस्थिती निर्माण झाली आहे.

         घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले संपूर्ण शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले गावातील अनेक घरात पाणी शिरल्याने वर्षभराचे साठवलेले धान्य, कपडे जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने गावातील नागरीक मोठ्या संकटात सापडले आहेत. याची माहिती मिळताच ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिशभाऊ वारजूकर यांनी पिंपळगांव गाठून पूर परस्थितीत नुकसान झालेली शेतीची पाहणी केली.

       या वेळी चिमूर विधानसभा ब्रह्मपुरी विभाग तालुका अध्यक्ष नेताजी मेश्राम, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिताताई पारधी, ग्रामपंचायत सरपंच सुरेश दुणेदार, ग्रामपंचायत सरपंच कालेता रामाजी पिल्लारे, ग्रामपंचायत उपसरपंच चांदली उपसरपंच संदीपजी बगमारे,माजी सरपंच खंडाळा, ग्रामपंचायत उपसरपंच पिंपळगांव जगदीशजी बनकर,कांग्रेस कार्यकर्ते गुड्डू बगमारे,तंटामुक्ती अध्यक्ष अक्षय लोंढे, ग्रामपंचायत सदस्य सेशरावजी ठाकरे, अनिलजी शेबे,जयपालजी पारधी,दादाजी मिसार, गिरधर भाजीपाले, मनोहरजी ठाकरे, बंडूजी विधाते,बाळकृष्ण बागळे, संदीप मिसार, योगराज ठाकरे, भक्तप्रल्हाद शेंडे, गजाजन राऊत, व गावकरी मंडळी, कांग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.