आमदार बंटीभाऊ बरं झाले! आपण चिमूर विधानसभा क्षेत्रातील बहिणींची रक्षा करण्यास पुढे आले… — भाऊ!”आपण शब्दांच्या आड बहिणीसाठी नेमके काय-काय करणार आहात? — “भाऊ,”बहिणींना,प्लास्टिकचे मंगळसूत्र देणाऱ्या रक्षाबंधनाची अजब परंपरा कळलीच नाही…. — चेल्याचपाट्याकडून नाहक बदनामी करणे झाले सुरु,धमक्याही येवू लागल्यात,पण मी मरणाला घाबरत नाही!आजही मरण आले तरी हसत स्विकरतो…. — रक्षाबंधन कार्यक्रम…अभ्यंकर मैदान चिमूर….

 

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक 

          आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी रक्षाबंधन कार्यक्रमाच्या निमित्ताने अभ्यंकर मैदान येथे संबोधित केल्या प्रमाणे सर्व प्रकारची क्षमता आणि संपदा त्यांच्याकडे असल्याचे त्यांच्या मनोगतातून पुढे आले. 

            याचबरोबर अभ्यंकर मैदान चिमूर येथे ३ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या रक्षाबंधन कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व बहिणींना मार्गदर्शन करताना आमदार बंटीभाऊ भांगडिया म्हणाले होते की,संकट-अळचण-आल्यास खंबीरपणे विश्वासाने तुमच्या पाठीमागे उभा राहील व काठी-ढाल-रक्षक बनून तुमचे रक्षण करेल…

           चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्राच्या आमदार लोकप्रतिनीधींचे शब्द लय भारी व भरकम आहेत.असे शब्द बोलून जाणे सहज शक्य आहे.पण,बोललेल्या शब्दाप्रमाणे कृती करणे लय अवघडही आहे.

              आमदार भाऊ कृती करताना कधी जात आडवी येते तर कधी मतदार आडवा येतो,कधीकधी मनस्थिती आडवी येते तर कधी विचार आडवे येतात,कधी कार्यकर्तेच आडवे येतात तर कधी धर्म व्यवस्था आड येते,याचा अनुभव बऱ्याच मतदारांना किंवा नागरिकांना आला असेल हे नाकारता येत नाही.

            कारण गाव पातळीवरील पक्ष कार्यकर्त्या खबऱ्यांकडून किंवा पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्याशिवाय तुम्ही मदत करत नाही एवढे पक्के आहे.

                 तुमच्या गावपातळीवरील कार्यकर्ता खबऱ्यांकडून किंवा पदाधिकाऱ्यांकडून माहिती तुमच्या पर्यंत कशीही येवो त्या माहितीवर तुम्ही विश्वास ठेवून किंवा त्या माहितीला प्रमाण मानून मदत करण्याचे निर्णय तुम्ही घेताय हे मला प्रकर्षाने जाणवले.सत्य परिस्थिती अवगत केल्यानंतर सुध्दा बऱ्याच रुग्णांना व गरजूंना तुमच्याकडून मदत मिळाली नाही असेही प्रसंग तुमच्या आड कदाचित घडले असतील..किंवा जाणिवपूर्वक झाले असतील हे नाकारता येणार नाही.

          आणि तो प्रत्येकाचा एक प्रकारचा जाणिवपूर्वक किंवा विसरभोळा स्वभाव गुणधर्म असतो हे प्रत्येकांनी मान्य करायलाच पाहिजे …मदत संबंधाने,मदत मागणाऱ्यांना व मदत देणारऱ्यांनाच सत्यता माहिती असते हेही तेवढेच खरे आहे.

              आमदार भाऊ,”सख्या बहिणीवर,भावांवर,नातेवाईकांवर जेवढ्या आपुलकीने व जिव्हाळ्याने प्रेम करतोय व त्याच पध्दतीने एकमेकांचे नाते जपतोय,अशाच प्रकारे हजारो मानलेल्या नात्याला जपता येत नाही हे सुद्धा तेवढेच सत्य आहे.

               “बोलाचाच भात व बोलाची कढी,असी एक म्हण गावपातळीवर खूप प्रचलित आहे.म्हणजेच सख्यात व परक्यात अंतर असते असे खेड्यातील नागरिक दिमाखदार आवाजात एकमेकांसी चर्चा करताना बोलत असतात‌ आणि ते बोलतात ते खोटे आहे असे म्हणताही येत नाही.

              तुम्ही आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमाला अभ्यंकर मैदान चिमूर येथे आलेल्या हजारो बहिणींचे नाव तुम्हाला माहिती नसतील.याचबरोबर त्यांची परिस्थिती सुद्धा तुम्हाला माहिती नसेल.तद्वतच भाचे,भाच्या,भाऊजी,जावई काय करतात याची कल्पना सुद्धा आपणास नसेल.याचबरोबर बहिणींना राहायला घर आहे की नाही,त्यांना खायला अन्न आहे कि नाही,त्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी त्यांच्या जवळ रुपये आहेत कि नाही,या बद्दल सुद्धा आपणास सुताराम कल्पना नसेल.आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्या बाबत आपण अनभिज्ञ असाल…

         हजारो बहिणींच्या समस्या बाबत व संकटा बाबत माहिती नसलेले आमदार भाऊ हे कार्यकर्त्यांच्या सांगोवांगीने बहिणींना अल्प मदत करणारे असतील किंवा करणारे नसतीलही ..

            मात्र,बहिणीला संकट व समस्या प्रसंगी,”सख्खा भाऊ पाचचे दहा करुन तुरंत मदत करतोय हे सुद्धा वास्तव्यातिल खरे आहे.

              एका कार्यक्रमाला तुम्ही बहिणींना मिक्सर दिले होते व २०२३ च्या रक्षाबंधन कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही बहिणींना साड्या व मंगळसुत्र दिलेत.परंतू मिक्सर,साड्या व मंगळसुत्र यांची क्वालिटी आपण बघितले नव्हती काय?आणि आमदार भाऊ,सख्खा भाऊ आपल्या बहिणीला लो क्वालिटीचे सामान देतो काय?आणि दिलेल्या साड्यांची किंमत तुम्हालाच माहीती.त्यावर भाष्य करणे उचित नाही.

          मात्र बहिणींना प्लास्टिकचे मंगळसूत्र देण्याचे कारण काय होते?आमदार भाऊ बहिणीला मंगळसूत्र देण्याची परंपरा महाराष्ट्र राज्यात तरी नाही.तिचा पतीच तिला मंगळसूत्र घेत असतो व आपल्या पत्नीच्या गळ्यात बांधून तिचा अर्धांगिनी म्हणून स्विकार करतोय हे आपणास माहित आहे ना!.

           पण,”भाऊ,रक्षाबंधन दिनानिमित्त हजारो बहिणींना दिलेल्या प्लास्टिकच्या मंगळसूत्राचे रहस्य नेमके काय आहे हे हजारो बहिणींना तरी सांगा ना?कि,अनभिज्ञतेतून मंगळसूत्र साड्या बरोबर दिलेत?मग बहिणींना मंगळसूत्र दिल्यासंबंधाने मोठ्या प्रमाणात झालेली घोडचूक हजारो भाऊजी व जावयांना मान्य असेलच असेही नाही.कारण पत्नीला मंगळसूत्र देणे हा केवळ तिच्या पतिचाच अधिकार असतो..मग तो गरीब असो की श्रीमंत असो…

           बहिणींना मंगळसूत्र देण्याबद्दल झालेली घोडचूक अमान्य असली तरी रेटून धरणारा तो घटनाक्रम नाही. 

            कार्यक्रमातंर्गत जागोजागी चल-अचल मालमत्ता आमदार बंटीभाऊ भांगडिया हे अलिकडच्या काळात सांगतांना दिसतात.ते आपल्या चल – अचल संपत्तीच्या माध्यमातून नागभीड व चिमूर तालुकातंर्गत मानलेल्या हजारो बहिणींच्या मुलांचे म्हणजे भाच्यांचे व भाचिंचे भविष्य उज्वल करणार काय? त्यांना उत्तम शिक्षणासाठी व योग्य रोजगारासाठी आवश्यक ते आर्थिक मदत करणार काय?हा प्रश्न अतिशय महत्त्वाचाच आहे.

            कारण आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या म्हणण्यानुसार ते आमदारही आहेत व श्रीमंत उद्योगपती सुध्दा आहेत.यामुळे तुमच्याकडे सत्तेचा व रुपयांचा पावर आहे असे म्हणायला हरकत नाही.

            आमदार भाऊ सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाने विविध कार्यक्रमासाठी,सभागृहे व देऊळे बांधकामासाठी तुमचे मन व हात खूप सैल असल्याचे लोक सांगतात.मग आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी मानलेल्या भाच्यांच्या व भाचिंच्या उज्वल भविष्यासाठी त्यांचे मन व हात सैल करणार आहेत काय?

            मतावर नजर ठेऊन आर्थिक मदत व वस्तू स्वरुपात मदत करणे आणि बेरोजगार तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी व बहिणींच्या उन्नतीसाठी हृदयातून मदत करणे यामध्ये खूप अंतर असते?या अंतराला नेहमीसाठी आमदार बंटीभाऊ भांगडिया कमी करणार काय?हा गहण व अनुत्तरीत असाच मुद्दा आहे.

            रक्षाबंधन कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी बहिणीला मदत करण्यासंबंधी बोलून गेलेले शब्द दूरगामी परिणामाचे आहेत आणि ऋणानुबंधणाचा वारंवार उकल करणारे आहेत.म्हणूनच सदर शब्द व त्यानुसार कर्तव्य पुढेपुढे सर्वांच्या समोर येणार आहेत.

***

बदनामी…

           “आमदार भाऊ,तुम्हाला माझा स्वभाव व माझ्यातील स्वयंमता माहिती आहे. याचबरोबर माजी स्थिती व परिस्थिती सुद्धा तुम्हाला अवगत आहे.लपून असे काही नाही…

          तद्वतच माझी पत्रकारिता सुध्दा उघड आहे.वास्तविक पत्रकारिता करणे माझा गुणधर्म आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे.

          आणि वास्तविक पत्रकारिता केल्याशिवाय राजकीय व सामाजिक स्थितीला व परिस्थितीला न्याय देता येत नाही हे सुद्धा एका दैनिक पेपरचे मालक म्हणून तुम्हाला माहिती आहे.

        मात्र,काही चेलेचपाटे मला नाहक बदनाम करण्यासाठी कामाला लागले आहेत.ज्यांनी बदनाम करण्याच्या कामाला लावले त्यांचे नाव सुध्दा मि शोधून काढली आहेत.

           बाजारु बदनामी करण्याचे परिणाम काही होणार नाही.झेलतोय सर्व!…

****

मरण आणि स्थिती..

          तथागत भगवान गौतम बुध्द,महान राजा सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले,क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले,छत्रपती राजश्री शाहू महाराज,जगविख्यात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,मान्यवर कांशीराम,संत नामदेव महाराज,संत तुकाराम महाराज,संत कबीर,संत घासिदास,संत रविदास,संत गाडगे बाबा,राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या विचारान्वये सखोल प्रेरीत असल्याने मरणाला हसत स्विकरणारा व्यक्ती आहे.यामुळे मरणाची भिती मला अजिबात नाही.

***

संबंध…

     आमदार भाऊ तुमच्या सह भाजपाच्या बऱ्याच पदाधिकारी व कार्यकर्तां सोबत माझे सलोख्याचे संबध मैत्रीपूर्ण आहेत.पण,दूरमिळ!कधीकाळी वेळप्रसंगानुसार भेटीचे…

****

आणि….

     मी न भिणारा व न घाबरणारा संवेदनशील फकिर आहो‌.यामुळे फकिर मानसाला भौतिक सुखाची जास्त गरज राहात नाही. 

           आयुष्यात अळचणी व समस्या सर्वांना लागू आहेत.मग मि कसा सुटणार?

***

तक्रार…

    अजिबात नाही…

          काळ आणि वेळ समजतोय….