आळंदी : काव्यमित्र संस्थेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आणि कर्मवीर काळबांडे यांच्या द्वितीय स्मृतीदिनाचे औचित्य साधून पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात कोरोना संसर्गकाळात उल्लेखनीय काम करणाऱ्या कोरोना योद्धा वैभवी मल्टीस्पेशालिटी क्लिनीकचे सर्वेसर्वा डॉ.सुनिल वाघमारे यांना राष्ट्रीय समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी माजी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर, पिंपरी चिंचवड मनपाचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले.यावेळी भगवानराव पासलकर,भाऊसाहेब जंजीरे,राजेंद्र सगर,विठ्ठल शिंदे,राज दिवटे,पुरुषोत्तम महाराज हिंगनकर,अनिल जोगदंड,आदर्श उपाध्याय आदी मान्यवर उपस्थित होते.
कोविड विरोधातील लढाई आपण लढलो. त्यामुळे अनेकांना ‘कोविड योद्धा’ असे संबोधले जाते. या काळात प्रत्येक घटकाने अत्यंत जबाबदारीने व झोकून देऊन काम केले, त्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काव्यमित्र संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात येत असल्याचे मत काव्यमित्र संस्थेचे अध्यक्ष राज सगर यांनी व्यक्त केले.
प्रत्येकजण आपले कर्तव्य नेटाने पार पाडत असले तरी केलेल्या चांगल्या कामाची पावती मिळाली तर उत्साह वाढतो, आणखी उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळते. कोविड काळात सर्वांनी सांघिक भावनेने काम केले त्यामुळे कोविड विरोधातील लढाईत आपण जिंकू शकलो अशा भावना डॉ.सुनिल वाघमारे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या आहे.