कमलसिंह यादव

प्रतिनिधी

 

पारशिवनी:- जनावरांमध्ये आढळून येणार्‍या लम्पी आजाराचा विळखा आता घट्ट होत असल्याचे पहायला मिळत आहे. 

    जिल्ह्यात यापूर्वी सावनेर आणि हिंगण्यातील काही जनावरांमध्ये या लम्पीसदृश आजाराने बाधित जनावरे आढळून आली होती.परंतु आता शुक्रवारी आणी शनिवारी पारशिवनी तालुक्यातही या लम्पीसदृश आजाराने बाधित चार जनावरे आढळून आली आहेत.यात बखारी येथे दोन गाई व साटक येथे दोन गाईना सदर आजार आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण लम्पीसदृश आजार बाधित जनावरांची संख्या २४ वर गेली आहे.यामुळे प्रशासनाने खबरदारी उपाय सुरू केले.

       बाधीत जनावरे मिळालेल्या भागातील ग्रामपंचायत बखारी, वाघोड,नांदगांव,मेहंदी,गरंडागवना,साटक,निमखेडा,डुमरी कला,बेलडोगरी,या गावतील १ हजार ८६० गाई व बैलाचे लशीकरण शुक्रवार व शनिवारला करण्यात आले असून एकुण ६०० गाईबैलाच्या कोठ्यांची फवारणी करण्यात आली आहे.

         तद्वतच रविवारी लसिकरण व फवारणी मोहीम चालु राहणार अशी माहीती तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश ठाकुर यांनी दिली.पाच किलोमीटरच्याअंतरावरील परिसरातील जनावरांचे लसीकरणही सुरू करण्यात आले आहे.शासनाकडून १० हजार लसी मिळाल्या असून अतिरिक्त लशींची मागणी करण्यात आली आहे. 

     पारशिवनीतील माहिती मिळताच जिल्हाधिकारी,मुख्य अधिकारी,एस.डि.ओ, तहसिलदार,बिडिओ,जिल्ह्याचे, तालुकाचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी संबंधित शेतकर्‍यांकडे पोहोचले.प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तालुकात साडेतीन हजारांवर लशीही पाठविण्यात आल्या आहेत. 

     जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) योगेश कुंभेजकर यांनीही सदर गावाला भेट दिली.उपाययोजनांची माहिती घेतली. 

    आजाराची तीव्रता अधिक नसून तो नियंत्रणात असल्याने शेतकर्‍यांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांना सांगितले. तर यापूर्वी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचा अद्यापही अहवाल प्रतीक्षेत असून,तो अहवाल हाती येताच या जनावरांना लम्पीचीच लागण झाली आहे की इतर आजाराची हे स्पष्ट होणार असल्याचे पशुसंवर्धन तालुका अधिकारी डाॅक्टर गणेश ठाकुर यांनी सांगितले.

    पारशिवनी तालुकातील जिल्हा परिषद सदस्य अर्चना भोयर,बखारीचे सरपंच नरेश ढोणे,साटकच्या सरपंच सिमा उकंडे,यांनी शेतकऱ्यांना धिर देत शेतकऱ्यानी जनावरातील लंपी व्हायरस आजारान्वये घाबरू नये.

तसेच तालुक्यातील पशुवैधकिय अधिकारी डॉ. गणेश ठाकुर,डॉ.ए.पी.चिमोटे,डॉ.टेकाम,डॉ.प्रिती वाळके,डॉ बबिता मेश्राम,डॉ.पुजा काळे,डॉ.प्रिती सिरसाट,डॉ.सुरेश मांडलिक,डॉ. शिशुपाल मेश्राम,डॉ.नेवारे,यांच्यासह पुर्ण टिम साटक व बखारी ग्राम पंचायत पासुन पांच किलो मीटर अंतरावरिल बखारी,वाघोडा,नांदगाव,मेहदी,गरंज गवना,साटक,निमखेडा,डुमरी कला,व बेलडोगरी गावात लसिकरण व फवारणी करून गाई बैल यांची तपासणी करित आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com