रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा )ताडोबा बफर झोन अंतर्गत येत असलेल्या पळसगाव वनपरिक्षेत्र मधील मदनापूर,येथील जय लहरी जय मानव माध्यमिक शाळेला वन व्यवस्थापण समिती मदनापूर च्या वतीने शाळेतील मुलाना ई लर्निंग प्रोजेक्टर भेट देण्यात आले.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाला अन्य साधारण महत्व असून विद्यार्थ्यांना ई लर्निंग प्रोजेक्ट मुळे अभ्यास चांगला होऊन त्याच्या ज्ञानात भर पडेल असे प्रतिपादन वनरिपक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम यांनी वेक्त केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमोल कवासे वनपाल , वनरक्षक निलेश बनकर , भक्तदास जिवतोडे मुख्याध्यापक,देविदास जांभळे अध्यक्ष वन समिती मदनापूर,भाष्कर बावणकर,जांभुळे, दांडेकर, रोकडे शिक्षक मयुर ठवरे व शाळेतील कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.