श्री गणेश दत्त राधाकृष्ण गुरु मंदिर लाखनी येथील वर्धापन दिन… — वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम… 

  चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

        स्थानिक लाखनी येथील श्री गणेश दत्त मंदिराच्या वर्धापन सोहळा 17 ऑगस्ट 2024 रोजी श्रावण शुद्ध त्रयोदशीच्या पावन पर्वावर उत्साहात संपन्न झाला.

          यावेळेस मंदिर समितीद्वारे विविध धार्मिक विधी आयोजित करण्यात आले. सकाळी 8.30 ते 11 वाजता पर्यंत मंदिरातील विविध प्राणप्रतिष्ठित मुर्तांवर अभिषेक संपन्न झाला. रुद्राभिषेक, पुरुष सूक्त, प्रमुख उपासकाद्वारे संपन्न झाले. सामूहिक उपासना सकाळी 11 ते 12:30 पर्यंत करण्यात आली. सर्वांनी दिगंबरा… दिगंबरा… या जपाचे तीन माळा पूर्ण केल्या. त्यानंतर गुरुपरंपरेतील सर्व आरत्या संपन्न झाल्या. 

          दुपारी 12 ते 1.30 वाजता पर्यंत विविध उपासकांचे मनोगत झाले. त्यात केंद्रप्रमुख अरुण कडबे, विकास खेडीकर, विजय भुते, सौ उषा कडबे, श्रीमती स्वाती मुंडले, सौ वनश्री कानतोडे, सौ रेखा भुरे, प्रा अर्चना शेष यांनी उपासना व पत्र भेट या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर तीर्थप्रसाद करून कार्यक्रम संपन्न झाला.

           कार्यक्रमाचे संचालन प्रा. विकास खेडीकर यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख यजमान रमेश पंचभाई यांनी आयोजित केलेल्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला एकूण शंभरहून अधिक उपासकांनी आपली हजेरी लावली असून भंडारा, लाखनी आणि साकोली येथील उपासक प्रामुख्याने उपस्थित होते.

               या कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी लीना फलके यांनी आपल्या परिवारासह उपस्थिती लावली असून अतिशय प्रसन्न व आनंददायी वातावरणात मंदिराचा वर्धापन दिवस संपन्न झाला.