जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिवापूर बंदर येथे श्री शारदा माता भजन मंडळाच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर :- तालुक्यातील शिवापूर बंदर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने शिवापूर बंदर येथील श्री शारदा माता भजन मंडळाला भजनाच्या माध्यमातून मुलांच्या कला गुणाना वाव मिळावी याकरीता 17 ऑगस्ट ला आमंत्रीत केले होते.

           या भजनाच्या माध्यमातून शाळेतील मुलांना बिन दप्तरी शाळेविषयी तसेच देशभक्तीपर गीत, साक्षरता गीत, अधंश्रध्दा, ग्राम, ग्राम स्वच्छता, व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाव, आरोग्य, भजन गिताच्या माध्यमातून प्रबोधन केले या भजन गिता दरम्यान शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मनमग्न झाले.

          या भजन मंडळातील कलाकार सहकारी मित्र परिवार श्री शारदा माता भजन मंडळाच्या ह.भ.प. श्रीकृष्ण नन्नावरे महाराज, ह.भ.प.बंडुजी तराळे, ह.भ.प. लालाजी शेन्डें देविदास श्रीरामे, ज्योती नन्नावरे, प्रेमीला तराळे, छाया देहारे, गिता गायकवाड, प्रभावती गायकवाड, अनिता नन्नावरे, सुनिता दडमल, लता तराळे, विनाताई नन्नावरे, पार्वता नन्नावरे या प्रबोधनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

          मुख्याध्यापिका सौ. उज्वला अशोक कामडी मॅडम व सहाय्यक शिक्षक श्री. अतुल भिमराव महाजन व शाळा व्यवस्थापन समिती भिमराव महाजन यांनी या भजन मंडळाचे आभार मानले आहे.