देलनवाडी वनपरिक्षेत्रातंर्गत बांध गाव व बोर्तोला शेत शिवारात रानटी हत्तीचे आगमन.. — धान पिकांचे मोठ्या प्रमाणात केले नुकसान..

 

     राजेंद्र रामटेके 

तालुका प्रतिनिधी कुरखेडा 

          देलनवाडी वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या बांध गाव व बोर्टोला गावांच्या शेत शिवारात रात्री २ वाजता धानाचे पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून हत्ती जंगल परिसरात गेले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली.

           बांध गाव येथील वनरक्षक गागलीवार व राऊंड ऑपिसर राऊतसह त्यांच्या टीमने हत्तींची शोध मोहीम सुरू केली आहे.याचबरोबर धान पिक नुकसानी बाबत पंचनामे तात्काळ करीत आहेत.

         नुकसान ग्रस्त शेतकरी लोकेश आसाराम राणे,खुशाल मारोती चुरपाल,किशोर यादव राणे,सुमित्रा रामदास राणे,माधव सुकरु करचार या सर्व शेतकऱ्यांच्या धानपिक नुकसान बाबत पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी व रानटी हत्तींचा बंदोबस्त त्वरीत करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.