ऋषी सहारे
संपादक
आरमोरी – तालुक्यातील कासवी कक्ष क्रमांक ८९ मध्ये गुराखी गुरे चारत असताना टय्या नावाचा वाघ अगदी समोर आला समोर संकट दिसत असताना गुराखी इसमा ने सर्व शक्ती एकवटून वाघाशी दोन हात केले त्यात गुराखी जखमी झाला.
आजू बाजूला आवाज गेल्याने व कासवी गावापासून एकाद किमी वर असल्याने आर्डाओरड झाली व टय्या निघून गेला परंतु गुराखी इसम जखमी झाला त्याला उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.सदर घटना ही दुपारी चार वाजता चे दरम्यान असल्याचे समजते. कासवी येथिल रविंद्र धोंडोबा पुसाम यांच्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले असता त्यांना ग्रामीण रुग्णालय, आरमोरी येथे भरती करण्यात आले.
तिथे अविनाश मेश्राम वपअ आरमोरी व धांडे वपअ वडसा, मुखरू किनेकर क्षेत्र सहा.पळसगाव यांनी जखमी इसमांची भेट घेऊन विचारपूस केली व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली.