कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी: १७ ऑगस्ट रोजी तालुका कृषी विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह पारशिवनी येथे AIF अंतर्गत एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उदघाटन व अध्यक्षा सौ मंगलाताई उमराव निंबोने सभापती पंचायत समिती पारशिवनी यांचे हस्ते करण्यात आले.
तसेच प्रमुख पाहुणे श्री.रणजित दुसावर सर तहसिलदार पारशिवनी,श्री.सचिन सोनोने सर संचालक नाबार्ड नागपूर,श्री.अरविंद उपरीकर सर जिल्हा नोडल अधिकारी स्मार्ट नागपूर,श्री.सुभाष जाधव सर गट विकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी,श्री.गेडाम सर,सौ.गावंडे मॅडम स्मार्ट नागपुर,श्री.पंकज गिरडे सर स्मार्ट नागपुर इत्यादी प्रामुख्याने उपस्थिती होते.
कार्यक्रमचे सूत्रसंचालन श्री.मनोज नासरे सर यानी केले व प्रास्ताविक श्री.सूरज शेंडे सर यांनी केले.
तालुका कृर्षी अधिकारी पारशिवनी यांनी शेतकरी उत्पादक कंपनी तसेच शेतकरी गटानी या योजनांचा लाभ घ्यावा व घेण्याकरिता प्रोत्साहीत केले.तसेच ग्रिडे सर यांनी AIF बदल सर्व संकल्पना bLBC सदस्य,शेतकरी उत्पादक कंपनी,शेतकरी गट ई. सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच ईतर मान्यवरानकडून पुरेपूर महत्वपुर्ण उपयोगी अशी माहिती देण्यात आली.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संजय सत्येकर,विलास मेश्राम प.स. सदस्य,राजूभाऊ दूनेदार नवेगावखैरी सरपंच,फजितजी साहारे,अभिजित फासोले,विजय बागडे,मोरेश्वर खोब्रागडे,रामभाऊ जुनघरे,नंदू गजभिये,बबलू धांडे,इत्यादी सह प्रगतशील शेतक-याची उपस्थिती होती.तसेच कृषी विभागातील सर्व कर्मचारी व उमेद अभियान अंतर्गत सर्व कर्मचारी उपस्थित होते व शेवटी आभार प्रदर्शन श्री प्रमोद सोमकुवर सहाय्यक तंत्रधान व्यवस्थापक आत्मा यांनी केले व कार्यक्रमाची सांगता केली.