राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेतील विजेता संघाचे हर्षवर्धन पाटील व अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते सत्कार संपन्न…

बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

       प्रतिनिधी इंदापूर : एस बी पाटील इंटरनॅशनल स्कूल वनगळी (सीबीएससी माध्यम) या शाळेतील खेळाडूंनी एम एल बी द्वारा आयोजित बेसबॉल स्पर्धेमध्ये आपल्या विजयाची घोडदौड कायम राखत विभागीय पातळी व राज्य पातळीवर उत्तुंग यश संपादन करता बँगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळी स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला.

         शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व मंत्री श्री हर्षवर्धन भाऊ पाटील व संस्थेच्या उपाध्यक्षा तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

               तसेच याच संघातील अथर्व कोळेकर या विद्यार्थ्यांची भारतीय संघात निवड झाली. यास तो आंतरराष्ट्रीय पातळीवर तैवान येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जाणार आहे. त्याच बरोबर अथर्व याने होम रन डर्बी या स्पर्धेत सर्वात जास्त होम रन करून बेस्ट प्लेअरसह किताबसह मानाची स्लगर पटकावली. उपांत्य फेरी चे सामन्यात आधिराज जाधव याने होम रन करून प्लेअर ऑफ मॅच सह बेस्ट बॉल पटकावला.

             यांना क्रीडा शिक्षक सचिन फुले, राहुल धोत्रे, साहिल बागवान यांनी मार्गदर्शन केले. अशी माहिती शाळेचे प्राचार्य श्री शैलेश दरेकर यांनी दिली. संस्थेच्या सचिव सौ भाग्यश्री ताई पाटील व राजवर्धन दादा पाटील यांनी ही यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन व सत्कार केला. यावेळी आण्णासाहेब कोळेकर, अमर जाधव, प्रशांत शेटे आदी पालक उपस्थित होते.