शंभरावर अधिकाऱ्यांची वारी मेळघाटातील जनतेच्या दारी! — लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक वेगळा प्रयत्न :- जिल्हाधिकारी सौरभ कटियार…

अबोदनगो सुभाष चव्हाण 

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

        दखल न्युज भारत

           अमरावती जिल्हा अंतर्गत मेळघाटातील विविध समस्या जाणून घेऊन ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी,त्याचबरोबर किरकोळ समस्यावर तिथेच मात करण्यासाठी आणि महत्वाच्या समस्या प्रशासनाच्या लक्ष आणून देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय समस्या चाचपणी उपक्रम राबविण्यात येत आहे. 

         या अंतर्गत शंभर अधिकारी यांचे पथक मेळघाटात जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी दिली.

           मेळघाट मधील ज्या विविध समस्या आहेत,त्या सोडवण्यासाठी शासन पातळीवर अनेक प्रयत्न करण्यात येतात.

        परंतु काही बाबी राहून जातात किंवा काही बाबी पूर्ण होत नाहीत.वेगेगळ्या विभागांचे वेगवेगळे अधिकारी मेळघाटात पाठविले आणि त्यांच्याकडून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्यास निश्चित त्यावर काही भरीव उपाययोजना करता येतील,हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 

         यासाठी वेगवेगळ्या दहा विभागातील शंभर अधिकाऱ्यांचे पथके तयार करून शंभर गावांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे पथक गावातील समस्या जाणून घेईल, गावांमधील वेगवेगळ्या संस्थांना भेटी देणार आहे. 

       याचबरोबर गावामधील वेगवेगळ्या समस्या आहेत,त्या कशा सोडवायच्या हे जाणून घेतील.नंतर जिल्हाधिकारी यांना हे अहवाल सादर करतील. 

         यातून एखादा चांगला उपक्रम राबवता येईल असे मत जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले.

        समस्या कशा जाणून घ्याव्यात यासाठी विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना,संपर्क अधिकारी डॉ.कैलास घोडके,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस यांनी ट्रेनिंग दिली आहे.

         गावामध्ये कोणत्या विभागांच्या कोणत्या बाबी बघायच्या याबाबत अवगत करण्यात आले आहे.यानंतर अधिकारी परत आल्यानंतर जिल्हाधिकारी यांना आपला अहवाल सादर करतील.यामधून निश्चितच सकरात्मक बाबी होतील अशी अपेक्षा आहे.

***

बाॅक्स…

      “मेळघाटातील समस्या जाणून घेण्यासाठी एकाच दिवशी शंभर अधिकाऱ्यांचे पथके मेळाटात जात आहेत.”एक दिवस मेळघाटासाठी,या अभिनव उपक्रमातून निश्चितच चांगल्या बाबी पुढे येतील आणि आम्हाला त्याच्यावर उपाययोजना करता येतील…

       सौरभ कटियार

   जिल्हाधिकारी अमरावती

***

या विभागांचे अधिकारी जाणार.

1. महसूल विभाग,तहसीलदार

2. ग्राम विकास विभाग,गट विकास अधिकारी 

3. महिला बालविकास विभाग,बाल विकास प्रकल्प अधिकारी 

4. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,उप अभियंता 

4. शिक्षण विभाग,गट शिक्षण अधिकारी 

5. पशु संवर्धन विभाग,पशुधन विकास अधिकारी 

6. बांधकाम विभाग,उप अभियंता 

7. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उप अभियंता 

8. कृषि विभाग विभाग,विस्तार अधिकारी 

9. जिल्हा परिषद,विभाग प्रमुख