आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव :- हर्षवर्धन पाटील… — हर्षवर्धन पाटील यांचेकडून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!..

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

                पंढरपूरचा विठ्ठल हे साऱ्या विश्वाचे दैवत आहे, असे मी मानतो. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी व भक्त हे पंढरपूरला येऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात. आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांना शुभेच्छा व्यक्त करताना काढले.

                वारकरी संप्रदायातील प्रत्येक जण हा आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठल चरणी लीन होतो. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टीने आषाढी एकादशीला प्रत्येक वैष्णवाच्या जीवनात महत्त्व आहे. आषाढी एकादशी ही महाएकादशी असल्याने सर्व वैष्णवांना मंगलमय शुभेच्छा हर्षवर्धन पाटील यांनी आषाढी एकादशी निमित्ताने व्यक्त केल्या.

चौकट 

 हर्षवर्धन पाटील यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन!

             हर्षवर्धन पाटील यांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाऊन बुधवारी (दि.17) पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. गेली 36-37 वर्षांपासून हर्षवर्धन पाटील हे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊनन न चुकता श्री विठ्ठलाचे दर्शन घेत आहेत. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.