वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाला अखिल भारतीय मिनीगोल्फ आंतरविद्यापीठ स्पर्धेत 3 सुवर्णपदके…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली – वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचलित वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी धनश्री पडोळे, फेअरवे महिला संघ आणि पुष्पा मीना आणि कृष्णा मीना, मिश्रित युगल मध्ये जगदीश प्रसाद झाबरमल टीबरेवाला विश्वविद्यालय झुनझुनू राजस्थान येथे झालेल्या अखिल भारतीय मिनीगोल्फ आंतरविद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

        याप्रसंगी त्यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष डॉ.ब्रह्मानंद करंजेकर, सचिव डॉ.वृंदाताई करंजेकर यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.सोमदत्त करंजेकर यांनी खेळाडूंचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

         महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील चतुर्वेदी यांनीही स्वागत करून महाविद्यालयाचे नाव अशाच पद्धतीने पुढे जावे यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रा. डॉ.जितेंद्रकुमार ठाकूर, मुख्याध्यापक डॉ.लोकनंद नवखरे, प्रा. देवेंद्र इसापुरे उपस्थित होते.