ऋषी सहारे
संपादक
देसाईगंज :- गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कोट्यावधी रुपये किंमतीचे लाखो क्विंटल धान खरेदी करण्यात आले असून सदर धानाची उचल करण्यात न आल्याने रब्बी हंगामातील धान खरेदी अडचणीत आली आहे.
यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जाण्याची दाट शक्यता लक्षात घेता खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाची यथाशिघ्र उचल करण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांचेकडे केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोली व मार्केटिंग फेडरेशन कार्यालय गडचिरोली मार्फत कोट्यावधी रुपये किंमतीची धान खरेदी करण्यात आली आहे.
मात्र संबंधित कार्यालयासी रितसर करारनामे करून स्थानिक राईसमिल कडून भरडाई करीता धानाची उचल करण्यात आली नसल्याने कोट्यावधी रुपये किंमतीचा धान केन्द्राच्या परिसरात, किरायाने गेतलेल्या गोदामात तर हजारो क्विंटल धान उघड्यावर पडुन आहे.
दरम्यान धान खरेदी सुरु झाल्याला आजमितीस ७ महिण्याचा कालावधी लोटल्याने मोठ्या प्रमाणात घट-तुट येण्याची शक्यता असुन अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान खराब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अशात शासकीय स्तरावरुन खरेदी करण्यात आलेल्या कोट्यावधी रुपये किंमतीचे धान वेळेत उचल न केल्यामुळे शासनासह संबंधित खरेदी विक्री संस्थांना देखील जबर फटका बसण्याची शक्यता आहे.यासोबतच आधिच खरेदी करण्यात आलेला धान केंद्रांवर तसाच पडुन असल्याने रब्बी हंगामातील धान खरेदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शेतकऱ्यांना खुल्या बाजारात धानाला आधारभूत किंमत मिळत नसल्याने व अद्यापही शासकीय धान खरेदी सुरु करण्यात न आल्याने शेतकऱ्यांतुन शासनाप्रती तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असुन होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी अधिकच अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.
ही गंभीर बाब लक्षात घेता जिल्ह्यात संबंधित अभिकर्ता संस्थेमार्फत खरेदी करण्यात आलेल्या धानाचे रितसर करारनामे केलेल्या राईसमिलर्सना भरडाई करीता देऊन धानाची यथाशिघ्र उचल करण्याची मागणी आमदार गजबे यांनी जिल्हाधिकारी दैने यांचेकडे केली असुन शासकीय स्तरावरुन धानाची उचल करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.