पातागुडम पोलीस मदत केंद्राचे पोलीस उप निरीक्षक अभिजित तुतुरवाड यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने आदिवासी बांधवासोबत साजरा. 

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

सिरोंचा :-पातागुडम हे गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगड सीमेलगत नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेले गाव.येथील आदिवासी बांधव आजही विकासापासून कोसोदुर आहेत. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मा. नीलोत्पल सर पोलीस अधीक्षक गडचिरोली मा.अनुज तारे सर अपर पोलीस अधीक्षक,मा.यतिष देशमुख सर अपर पोलीस अधीक्षक, मा. कुमार चिंता सर अपर पोलीस अधीक्षक, मा.सुहास शिंदे सर उपविभागीय पोलिस अधिकारी सिरोंचा यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिस दलामार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून पातागुडम पोलीस केंद्राचे पोलीस उप निरीक्षक अभिजीत तुतुरवाड यांनी त्यांचा वाढदिवस आदिवासी बांधवांसोबत साजरा करण्याचे ठरवले.त्यानिमित्त त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अनाठायी खर्चाला फाटा देऊन पातागुडम, रायगुडम,पेंडलया येथील 20 ते 25 लहान मुलांना कपडे,25 ते 30 महिलांना साड्या, 25 ते 30 पुरुषांना लुंगी व 15 ते 20 युवकांना टी शर्ट असे जवळपास 100 व्यक्तींना कपडे वाटून व अल्पोपहार देऊन साजरा केला.यावेळी उपस्थित सर्व आदिवासी बांधवांनी त्यांना शुभेच्छा देऊन पोलीस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रभारी अधिकारी बालाजी लोसरवार पोलीस उप निरीक्षक ऋषिकेश तळेकर सह जिल्हा पोलीस व SRPF चे अधिकारी,अमलदार यांनी परिश्रम घेतले.