कैलास गजबे- करजगाव प्रतिनिधी
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय डेंगू दिवस दिनांक 16 मे 2023 ला पार पाडण्यात आला असून प्रा. आ. केंद्र ब्राम्हणवाडा थडी उपकेंद्र ब्राम्हणवाडा थडी येथे संपूर्ण गावात चांगल्या प्रकारे राबविण्यात आले. प्रा. आ. केंद्र येथे डेंगू आजारा विषयी माहिती देण्यात. डेंगू आजारा विषयी कुठली काळजी आणि उपाय योजना कराव्यात त्या संदर्भात माहिती देण्यात आली. स्वच्छ तेचे महत्व काय असते आणि आपण आजारा पासून कसे दूर राहू शकतो याची माहिती देण्यात आली.
डेंगू आजारा विषयी प्रतिबंधात्मक उपाय योजना. कोरडा दिवस पाळणे, गाव स्वछता वैयक्तिक स्वछता चे महत्व पटवून सांगण्यात आले. या मध्ये अधिकारी वर्ग, आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तिका, आशा कार्यकर्ता उपस्थित होते. डेंगू आजारा विषयी समुपदेशन करून या कार्यक्रमाची सर्वदूर माहिती मिळावी यासाठी प्रा. आ. केंद्र ब्राम्हणवाडा थडी येथील आरोग्य सेवक आर. एस. खोंडे यांनी समुपदेशन केले. प्रा. आ. केंद्र ब्राम्हणवाडा थडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. खोंडे , डॉ. राठोड यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शन यामुळे डेंगू दिवस पार पाडण्यात आला. अश्या पद्धतीने ब्राम्हणवाडा थडी येथे राष्ट्रीय डेंगू दिवस साजरा करण्यात आला.