सैय्यद ज़ाकिर
सहव्यवस्थापक/जिल्हाप्रतिनिधी वर्धा..
हिगणघाट:- घटनेची सत्यता या प्रमाणे आहे की ,दी.१७ में च्या रात्री गस्त पेट्रोलिंग करीत असताना विश्वासनीय मुखबीरचे खबरे वरुन पो.ह.वा/110 नरेंद्र डहाके,ना.पो.शि /990 सचिन भारशंकर ,नापोशी/842 सचिन घेवन्दे,विशाल बंगाले/1515 यांनी नांदगांव चौरस्ता व विर्भगतसिंग वार्ड हिगणघाट येथे नाकेबंदी दरम्यान प्रो रेड करुंन आरोपी नामे राकेश बंड्डजी राठौड़ वय 22 वर्ष व आरोपी रामकिसन नारायण किलनाके वय 27 वर्ष दोन्ही रा.हिगणघाट हे संगमताने त्याचे त्याब्यातील बजाज पल्सर मोटरसाइकिल क्र.एम एच 31 /सी झेड 4200 वर एक प्लास्टिक चुगड़ी मध्ये देशी दारुच्या 50 बाटल वाहतुक करीत असताना मिळून आले.
तसेच आरोपी नामे प्रफुल अरुनराव भजभूजे वय 31 वर्ष रा ,इंदिरा ग़ांधी वार्ड,हिगणघाट त्याचे त्याब्यातील ऐक्टिवा मोपेड गाड़ी क्र.एम एच 31 /सी ई 9913 वर दोन मोठ्या प्लास्टिक कैन मध्ये 60 लीटर गावठी मोहा दारू वाहतुक करिताना रंगे हाथ मिळून आले.
तिन्ही आरोपिचे त्याब्यातून मोटरसाइकिल,मोपेड गाड़ी,देशी दारू व गावठी मोहा दारू माल असा ऐकून जु ,की 1,08,700/रु चा माल जप्त करुन अरोपिंना अप क्र0 542/2023 व अप क्र0 543/2023 दारू बंदी कायद्यान्वये दोन वेगवेगळे गुन्हे नोंद करून तपासात घेतले.
सदरची कामगिरी नुरुल हसन पोलीस अधीक्षक,डॉ.सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा,आबुराव सोनवने उपविभागीय अधिकारी हिगणघाट,पो.निरीक्षक कैलाश पुंडकर ,पोलीस स्टेशन हिगणघाट यांचे मार्गदर्शनात डी.बी. पथकाचे पो.ह.वा.नरेंद्र डहाके,ना पो शि सचिन भारशंकर ,सचिन घेवन्दे,विशाल बंगाले यांनी केली आहे.