अश्विन बोदेले
जिल्हा प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
गडचिरोली :- जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील आदिवासी व बिगर आदिवासी नागरिकांना मोह फुलाच्या संकलनातून रोजगार मिळत आहे . सदर हंगामी रोजगार आता महिनाभराचा काळ उलटल्यानंतर अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येत आहे.
विविध झाडापासून मिळणारे डिंक, फुल भाज्या,करवंदे व वनौषधी बघावयास मिळत आहे. मोहाची फुले राणावणात राहणाऱ्या आदिवासींच्या उत्पन्नाचे मोठे साधन आहे. उन्हाळ्यात त्यांची उपजीविका मोहाच्या फुलांवर होते. मोहाच्या फुलात साखर आणि अल्कोहोलचे प्रमाण चांगले असते. त्यापासून आदिवासी मध्य बनवितात. पण मोह फुलांचे इतरही अनेक उपयोग आहेत.
त्यापासून मोदक, पानोऱ्या, पुरणपोळ्या , व इतर अनेक पदार्थ बनविले जातात. याशिवाय व्हिनेगर बनविण्यासाठी सुद्धा मोह फुलांचा उपयोग होतो . विविध उपयोगासाठी मोहाच्या फुलांची मागणी आहे. मार्च ते एप्रिल महिन्यात मोहाची फुले बहरतात. या काळात आदिवासी व बिगर आदिवासी बांधव ही फुले संकलित करतात. त्यानंतर त्यांना वाळवून साठवून ठेवतात. व मागणीनुसार त्यांची विक्री करतात. तसेच घरी सुद्धा त्याचा विविध प्रकारे वापर करतात.