नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर द्वारा संचालित वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली व राजीव गांधी महाविद्यालय सडक अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शारीरिक सुदृढतेविषयी जागरूक करण्याकरिता राष्ट्रीयस्तर स्वास्थ व्यवस्थापनावर कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी, प्रमुख पाहुणे म्हणून बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी साकोलीचे प्रा. दिनेश पम्पालीया आणि ब्रह्मानंद करंजेकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी साकोलीचे प्राचार्य श्री. घनश्याम निखाडे तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणून राजीव गांधी महाविद्यालय सडक अर्जुनी चे प्रा. डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर आणि एस. चंद्रा महिला महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. स्नेहप्रभा गावंडे उपस्थित होते. अध्यक्षांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले कि शारीरिक सुदृढतेचे चार मुख्य स्तंभ आहेत, ज्यात सामर्थ्य, एरोबिक क्षमता, लवचिकता आणि शरीर रचना यांचा समावेश होतो. शारीरिकदृष्टीने सक्रिय राहिल्याने तुमचे मेंदूचे आरोग्य सुधारू शकते, वजन व्यवस्थापित करण्यात मदत होते, रोगाचा धोका कमी होतो, हाडे आणि स्नायू मजबूत होतात आणि दैनंदिन कामे करण्याची तुमची क्षमता सुधारते. जे प्रौढ लोक कमी बसतात आणि कितीही प्रमाणात मध्यम ते जोमदार शारीरिक हालचाली करतात त्यांना आरोग्याचे फायदे मिळतात. तसेच प्रमुख पाहुणे प्रा. दिनेश पम्पालीया यांनी शारीरिक हालचालींच्या सवयी आणि वैयक्तिक स्वास्थ्य विकसित करण्यासाठी व्यवस्थापन कौशल्ये आणि धोरणे याची माहिती दिली त्याचबरोबर प्राचार्य श्री. घनश्याम निखाडे यांनी सांगितले कि, आरोग्य आणि क्रीडा माहितीच्या मोजमापाद्वारे क्रीडा खेळाडूंच्या व्यायामाचे प्रमाण आणि फिटनेस पातळीचे परिमाणात्मक मूल्यमापन केले जाऊ शकते, ज्यामुळे प्रभावी स्वास्थ्य परिणाम सुनिश्चित होतात. ब्लॉकचेन आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाचा विकास स्वास्थ्य व्यवस्थापन तंत्रज्ञानासाठी एक नवीन दृष्टीकोन आणि तांत्रिक माध्यम प्रदान करतो.
शारीरिक सुदृढता म्हणजे काय शारीरिक सुदृढता वाढवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे याची माहिती डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर यांनी दिली तसेच शारीरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायाम. नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. व्ययामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते. नियमित व्यायामामध्ये ताणण्याचे व्यायाम, एरोबिक्स व श्वासाचे व्यायाम यांचा समावेश असावा असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगिलते. त्यानंतर एस. चंद्रा महिला महाविद्यालयाच्या डॉ. स्नेहप्रभा गावंडे यांनी शारीरिक तंदुरुस्ती बद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले कि शारीरिक तंदुरुस्तीचे पाच घटक आहेत शरीराची रचना, लवचिकता, स्नायूंची ताकद, स्नायूंची सहनशक्ती आणि हृदय श्वासोच्छवासाची सहनशक्ती. त्याचबरोबर चांगल्या आरोग्याचे महत्त्व काय आहे व त्यासाठी आपण कश्याप्रकारे काळजी घेतली पाहिजे याबद्दलचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. राजश्री यांनी केले. तसेच हा कार्यक्रम योग्यरित्या पार पडावा म्हणून महाविद्यालयातील सर्व कर्मचारी प्रा. नीरज अतकरी, देवेंद्र इसापुरे, पुकराज लांजेवार, शाहीद सैयद , दिव्या कुंभारे आणि विद्यार्थ्यांनी सहयोग केले.