डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
माहे फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारचे सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने एका जहाल नक्षलवाद्यास दिनांक १८/०४/२०२३ रोजी अटक केले.
दिनांक १७/०४/२०२३ रोजी मिळालेल्या गोपनिय खबरीच्या आधारे पोलीस मदत केंद्र गट्टा (जां.) हद्दीतील मौजा हाचबोडी जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान, पोमकें गट्टा (जां.) येथील पोस्ट पार्टीचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस बलच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून जहाल नक्षली नामे साधु ऊर्फ काय ऊर्फ संजय नरोटे, वय ३१ वर्षे, रा. झारेवाडा तह. एटापल्ली, जि. गडचिरोली यास अटक केली. तो सन २०१५ पासुन गट्टा दलममध्ये भरती होऊन सदस्य या पदावर कार्यरत होता. दिनांक २८/०३/२०२३ रोजी तो नक्षल दलम सोडुन घरुनच नक्षलविरोधी कारवाया करीत होता. त्याच्यावर पोलीस पार्टीवर अॅम्ब्युश लावणे, जाळपोळ करणे, पोलीस व निष्पाप नागरीकांना जिवे ठार मारणे, दरोडा इत्यादी गंभीर स्वरुपाचे २३ गुन्हे दाखल आहेत. त्यात १२ चकमक, २ पोलीस जवानांसहीत एकुण ८ खुन, २ जाळपोळ व १ दरोडा यांचा समावेश आहे. त्याचा धुळेपल्ली २०२०, कोदुर-२०२०, टेकामेट्टा-२०२१, गोरगुट्टा-२०२१, गुंडरवाही अॅम्ब्युश- २०२० या चकमकींमध्ये सहभाग होता. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने एकुण २ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे माहे जानेवारी २०१२ ते आतापर्यंत एकूण ६७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा. यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी नक्षलवाद्यांच्या हिसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.