नागपूरात कर्फ्यु,औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद,कलम १४४ लागू…. — प्रकरण चिघळले,जातीय दंगल भडकावणाऱ्या खऱ्या आरोपींचा शोध घेतला पाहिजे..‌ — सामान्य नागरिक,पोलिस,अग्निशमन दलाचे जवान अकारण भरडले जाऊ नये…

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक

        भुतकाळातील इतिहासच नवीन इतिहास घडवितो,हे ज्यांना कळत नाही ते धार्मिक तेढ निर्माण करुन जातीय दंगली जाणिवपूर्वक घडवून आणतात हे भारत देशातील लोक उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.

           आणि या जातीय दंगलींच्या माध्यमातून राजकीय पोळी आपल्या पदरात काही राजकीय व सामाजिक नेते पाडून घेतात हे सुद्धा स्पष्ट आहे.

               म्हणूनच जगप्रसिद्ध नागपूरात चारशे वर्षांपूर्वीच्या औरंगजेब यांच्या कबरीवरुन जातीय दंगल कोणी घडवून आणली?,दंगल घडवून आणणारे सुत्रधार कोण? त्यांचा शोध नागपूर पोलिसांनी निष्पक्ष घेतले पाहिजे आणि त्यांना बेड्या ठोकल्या पाहिजे या मतांचे नागपूरकर आहेत.

         औरंगजेबाच्या कबरीवरुन काल दुपारला काही संघटना कडून मोर्चा काढण्यात आला होता.यामुळे प्रकरण शांत झाले असे नागपूर पोलिस विभागला कदाचित वाटले असेल.

              पण,झाले उलटेच!काल सायंकाळी परत नागपूरात दंगल घडवून आणल्या गेली,अनेक गोरगरिबांची,सामान्य नागरिकांची वाहणे जाळपोळ करण्यात आली,घरे जाळण्यात आली.पोलिसांसह सामान्य नागरिकांना मारहाण करण्यात आली,हा प्रकारच मन शुन्य करणारा आणि डोके चक्रावून टाकणारा आहे.

        मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर शहरातील आहेत.त्यांच्या अंतर्गत येत असलेल्या पोलीस विभागाला,गुप्तचर विभागाला आणि इतर सर्व विभागांना जातीय दंगलीची भनक नसावी हे नागपूर करांचे एकप्रकारे र्दुदैवच म्हणावे लागेल.

           परंतू औरंगजेब यांच्या कबरी बाबत भडकावू भाषा बोलणारे कोण?त्यांनी धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काही सुनियोजित कट रचला होता काय? जातीय व धार्मिक दंगलीचा उद्रेक कुणी केला?याबाबत सुध्दा नागपूर पोलिसांनी नागपूरकरांच्या हितासाठी व सुरक्षेसाठी सखोल चौकशी केली पाहिजे.

           अशा दंगलीमुळे पोलिस अधिकारी व कर्मचारी,अग्निशमन दलाचे जवान,सामान्य नागरिक भरडले जातात,त्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याकडे सुध्दा जातीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

               देशभरात मुस्लिम बांधवांकडून रमजानचा पवित्र सण नियमानुसार पाळणे सुरू आहे,ते आपल्या धर्माच्या तत्वानुसार रमजान सण काटेकोरपणे पार पाडतात असे म्हटले जातय.यामुळेच या पवित्र सणात मुस्लिम बांधव जातीय तेढ निर्माण करण्यासाठी वाईट घटना करु शकणार नाहीत किंवा घडवून आणू शकणार नाहीत,असे म्हटले जातय.

      मात्र,औरंगजेब यांच्या कबरीवरुन जो सुनियोजित कट रचला गेला आणि सुनियोजित कटाद्वारे जातीय दंगल घडवून आणल्या गेली.त्या खऱ्या आरोपी पर्यंत महाराष्ट्र नागपूर पोलिस पोहोचले पाहिजे असे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे म्हणणे आहे.

             कलम १४४ अंतर्गत नागपूर मध्ये आज कर्फ्यु लागलेला आहे.काही भागात आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कोंम्बिग आप्रेशन सुध्दा नागपूर पोलिसांनी सुरु केले आहे.यामुळे नागपूरात जमावबंदी करण्यात आली आहे.

         तद्वतच दुकाने,चहाटपरी,पाणठेले,नास्ता दुकाने बंद करण्याच्या पोलिसांकडून नागरिकांना सुचनाही करण्यात आल्या आहेत.नागपूरच्या काही भागात तानाव सदृश स्थिती असली तरी,बाकी भागात नागपूर तणावयुक्त शांत आहे.