
चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधि भंडारा
साकोली :– येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यावरण सेवा योजना 5.0 तसेच राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब तर्फे पर्यावरणस्नेही होळी उपक्रमाचे आयोजन प्राचार्य बी एस लंजे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिक्षिका पुष्पा बोरकर, अंजना रणदिवे, प्रा.शीतल साहू,प्रा.राजेश भालेराव,प्रा.डी एस लांजेवार,प्रा. नरेंद्र भदाडे तसेच निलिमा गेडाम, कु. चिचमलकर, व माजी सक्रीय नेचर क्लब विद्यार्थिनी कु.पूर्वा बहेकार, कु.रूणाली निंबेकर यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये घेण्यात आला.
प्रास्ताविक करताना पर्यावरण सेवा योजना 5.0 व राष्ट्रीय हरित सेना योजना जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब संघटक प्रा.अशोक गायधने यांनी होळी सणाच्या वेळी देशभरात जाळल्या जाणाऱ्या लाकडाचे मुल्य तसेच रासायनिक रंगाने होणारे दुष्परिणाम यावर पुरेपूर माहिती वृक्षपूजन करून केरकचरा होळीचे महत्व पटवून दिले. यानंतर पुष्पा बोरकर व प्राचार्य बी.एस.लंजे यांनी उद्बोधक मार्गदर्शन केले. पुष्पा बोरकर यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांकडून पर्यावरण प्रतिज्ञा म्हणून घेतली.
यानंतर सर्वांनी स्वच्छता अभियान राबवून शालेय परिसर स्वच्छ केला.वृक्षपूजन करून त्यानंतर केरकचरा होळीचे प्रज्वलन प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले.होळी प्रज्वलन होत असताना अनेक पर्यावरणस्नेही होळी तसाच रंगपंचमी विषयक अनेक उद्घोषणा देण्यात आल्या.नेचर क्लबतर्फे वर्षभरातील आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण सुद्धा यावेळी करण्यात आले.
पर्यावरणस्नेही होळी निमित्ताने नैसर्गिक ओले व कोरडे रंग बनवा तसेच होळी संदेशविषयक फलक लेखन स्पर्धांचे आयोजन सुद्धा यावेळी करण्यात आले.कोरडे रंग बनवा स्पर्धेत प्रथम क्रमांक लिमांशी भाजीपाले व हर्षल भाजीपाले यांना प्रथम क्रमांक तर वैदेही दोनोडे ला द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक गुंजन घरत व मनस्वी राऊत यांना प्राप्त झाला.
प्रोत्साहनपर क्रमांक हर्षिका उके, दुर्वांशा चव्हाण, दिव्यांशी टेंभुरकर, गीत बांगडकर, लाची कापगते यांना प्राप्त झाला.ओले रंग बनवा स्पर्धेत प्रथम क्रमांक वैदेवी दोनोडे हिला तर द्वितीय क्रमांक गीत बांगडकर ला तर तृतीय क्रमांक अंश घोरमारे ह्याला प्राप्त झाला.प्रोत्साहनपर क्रमांक तृषा जांभूळकर, दिव्यांशी टेंभुरकर, श्रेया सलामे,हर्षिका उके, धनश्री संग्रामे, लिमांशी भाजीपाले ,हर्षल भाजीपाले यांना प्राप्त झाला.
इकोफ्रेंडली होळी संदेश फलक लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक वैदेवी दोनोडे,लिमांशी भाजीपाले यांना तर गीत बांगळकर व हर्षल भाजीपाले यांना द्वितीय क्रमांक तर चाहत अरकासे हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.प्रोत्साहनपर क्रमांक अंश घोरमारे, ईशांत येरणे यांना प्राप्त झाला.तिन्ही स्पर्धेतील सहभागी स्पर्धक रुपल खोब्रागडे,किरण धारणे, ओमेश्वरी वाढई, संघदीप तरजुले, क्रिशा भांडारकर, अनुष्का क्षीरसागर,प्रेरणा बोकडे, भुवी सपाटे,हर्ष धकाते, आराध्या यावलकर, मोहित लंजे, दुर्वांशा चव्हाण, आराध्या हुमणे, युक्ती हुकरे यांना सहभागपर प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन रिया भेंडारकर तर आभार प्रदर्शन निकिता धुर्वे,आरती गजापुरे यांनी तर रंग व फलक निरीक्षण परीक्षण पुष्पा बोरकर,अंजना रणदिवे,प्रा.शीतल साहू,गुंजन घरत,भुवी सपाटे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रिया भेंडारकर,आरती गजापुरे ,लूलेश्वरी संग्रामे,रजनी शेंडे, वैष्णवी मेश्राम, निकिता धुर्वे, योगिनी मस्के, तोशाली नेवारे, ईशिका निखारे, भूमेश्वरी भेंडारकर, ज्ञानेश्वरी धुर्वे, नानेश्वरी मेश्राम,वैदेवी दोनोडे, गीत बांगळकर,हितेश कोसरे यांनी स्वच्छता अभियान राबविण्यास व कार्यक्रम आयोजनास मदत केली त्याबद्दल त्यांना प्राचार्य लंजे सरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिक्षक वर्ग सर्वश्री शिवदास लांजेवार,शिवपाल चन्ने,दिनेश उईके,अविनाश मेश्राम, संजय पारधी, कृष्णा बिसेन, संजय भेंडारकर,प्रा.कुंदा नेवारे,प्रा.स्नेहल मते, प्रा.कमलेश मडकवार, प्रा.केशव कापगते,प्रा. विनोद हातझाडे,प्रा. प्रशांत शिवणकर,प्रा. जागेश्वर तिडके, कु.चिचमलकर , पारधी सर व इतर सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.