रोहन आदेवार
साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
वर्धा/यवतमाळ
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत सर्वच पक्ष शेवटच्या टप्प्यात आले आहेत.आता कोणती जागा कोणाला व कोणत्या जागेवर उमेदवार कोण,यावर चर्चा होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस कडून नितेश कराळे मास्तर यांच्या नावाची चर्चा असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली.
आपल्या खास वऱ्हाडी शैलीत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवत विदर्भ व महाराष्ट्रात तरुणाईमध्ये “खद खद सर” म्हणून ओळखले जाणारे नितेश कराळे आता चक्क लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली असून ते कसे विजयी होऊ शकते याची संकल्पना पटवून दिली.
खदखद’ मास्तर म्हणून संपूर्ण देशात ओळख मिळालेले वर्धा जिल्ह्यातील नितेश कराळे राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. समाज माध्यमांवर त्यांचे लाखो फालाेअर्स असून यामुळे कराळे यांच्या व्हीडीओंची सर्वत्र चर्चा असते.
त्यासोबतच ते स्पर्धा परीक्षा,समाजप्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्र तर सोडा भारतात सुद्धा त्यांचे मोठ्या प्रमाणात व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजीत केले जातात व त्यांना ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी जमते.ते आपल्या बोलण्यातून शासनाच्या चुकीच्या निर्णयाला नेहमी शिंगावर घेऊन अन्यायाविरुद्ध प्रहार करत असतात.तसेच ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक असतात.
राज्यातील पदभरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला वर्ध्यात नितेश कराळे यांनी जोरदार विरोध,रस्त्यावर उतरून आंदोलने केले याचा धसका घेत महाराष्ट्र शासनाने अखेर हा निर्णय रद्द केला.या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,आमदार सुनील केदार यांच्यासह विविध आमदार तसेच नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला होता.
त्यासोबतच त्यांनी घेतलेल्या व्हिडिओ मधील काही प्रश्न काढून आमदार व खासदार विधानभवन व संसदेत प्रश्न मांडत असतात.कराळे मास्तर यांनी आपल्या अधिकृत एक्स खात्यावरून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तिकीटासाठी बोलणी सुरू असून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पक्के असल्याचेही कराळे यांनी स्पष्ट केले.समजा पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उभे राहणार असेही मत त्यांनी व्यक्त केले.
मात्र,कराळे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यास महाविकास आघाडी वर्धा जिल्ह्यात अडचणीत येऊ शकते.