डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी साडेदहा वाजताचे दरम्यान चामोर्शी तालुकातंर्गत तलाठी साजा क्रमांक 1 नवेगाव (रै),मध्ये अंतर्भूत असलेल्या मौजा मालेरचक मंडळ कुनघाडा येथील कु, स्वीटी बंडू सोमनकर हिचा विज पडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.
सदर मुलगी इयत्ता 9 वी तील विद्यार्थीनीं होती.ती शाळेतून परत येत असतांना वीज कोसळली व ती गंभीर जखमी झाली.गंभीर अवस्थेत तिला उपचाराकरिता सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेत असता वाटेतच तिचा मृत्यू झाला.