कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- तालुक्यातील गट ग्राम पंचायत निंबा अंतर्गत आज शनिवार सकाळी सकरला गाव येथे “आमदार कार्यालय आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत सकरला येथे शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात सकरला गाव येथे राशन कार्ड- चे नविन १८ फार्म भरले गेले तसेच, ई- श्रम च्या कार्ड साठी -४८ लोकाची नोंदणी केली , संजय गांधी निराधार योजनेचे-०८ वृद्धाचे फार्म तयार केले , आभा कार्ड- ७४ व आयुष्यमान भारत-१०० लोकानी नोंदणी केली अशा प्रकारचे सकरला येथे शिवीरात विविध अर्ज स्विकारण्यात आले. आणि लवकरच या सर्व विषयांवर कार्यवाही करून कामे पूर्ण करण्यात येणार. असल्याची माहीती दिली.