कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- तालुक्यातिल ग्राम पंचायत साटक कार्यालयात आज दि.१७ मार्च २०२३ रोजी पारशिवनी तालुक्यातील ग्राम पंचायत साटक येथे “आमदार कार्यालय आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत शिबिर घेण्यात आले. या प्रसंगी ग्राम पंचायत सरपच तरुण बर्वे ,उपसरपंच रवि गुडधे सह ग्राम पचायत सदस्य प् प्रामुख्याने उपस्थित होते .
या शिबिरात ग्राम पचायत कार्यालय येथे “आमदार कार्यालय आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत शिविरात राशन कार्ड- ५९, ई-श्रम नोंदणी-१४, संजय गांधी निराधार योजनेचे-१०, नविन मतदार नोंदणी-११ व आयुष्यमान भारत कार्ड -३१ अशा प्रकारचे विविध अर्ज स्विकारण्यात आले. आणि लवकरच या सर्व विषयांवर कार्यवाही करून कामे पूर्ण करण्यात येणार अशी माहीती आमदार अँड आशिष जैस्वाल यांनी दिली.