दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीक्षेत्र आळंदीतून आषाढी यात्रेसाठी निघणारा पालखी सोहळा व संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा कार्तिकी यात्रेसाठी वारकरी भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी असलेल्या बंदोबस्ताचे कर्तव्य पोलिस दलातील पुढील सेवेसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयच्या सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी आळंदी येथे व्यक्त केले.
भक्ती शक्ती संघाच्या वतीने आयोजित मासिक वद्य एकादशी निमित्त भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयच्या सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचा विशेष सन्मान सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला होता. त्यांना यावेळी हार,शाल, श्रीफळ व सार्थ श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात आला. या भजन महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत भजनसम्राट पंडीत रघुनाथजी खंडाळकर यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी धनंजय वसले यांनी पखवाज व पांडुरंग पवार यांनी तबल्यावर साथ दिली. यावेळी पंडित कल्याण गायकवाड, पुरुषोत्तम महाराज पाटील, पंकज महाराज गावडे, सचिन महाराज पवार, आत्माराम महाराज शास्त्री, बाळासाहेब महाराज शेवाळे, लक्ष्मण महाराज पाटील, आबा महाराज गव्हाणे, संग्रामबापू भंडारे, संदीप महाराज लोहर, संतोषानंद शास्त्री, गणेश महाराज तापकीर, विठ्ठलजी सुरवसे, श्रीकांत महाराज दुराफे तसेच वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी आणि साधक मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.