युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
गौरखेडा येथील मिलिंद विद्यालयात जलसंपदा विभाग अमरावती दर्यापूर यांच्या अंतर्गत मिलिंद विद्यालयात जल जागृती अभियाना अंतर्गत जल पूजन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा विभाग दर्यापूर चे उपविभागीय अधिकारी शेगोकार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नखाते स उपविभागीय अधिकारी, शहा अभियंता, बनकर शाखा अभियंता, वासुदेव भांडे मुख्याध्यापक,
सुधाकर धुरंदर शाळा समिती सदस्य, हे उपस्थित होते.
मानवाच्या जीवनात पाणी किती महत्त्वाचे आहे हे मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. पाणी हेच जीवन आहे. म्हणून पाण्याचा वापर काटकसरीने करून पाण्याची बचत करणे काळाची गरज आहे. यासाठी 16 मार्च ते 22 मार्च पर्यंत जल जागृती अभियान राबवण्यात येत आहे. 22 मार्च हा राष्ट्रीय जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बनकर यांनी केले. तर सूत्रसंचालन दिपक कावरे व आभार प्रदर्शन प्रशांत वानखडे यांनी पार पाडले. कार्यक्रमाची सांगता मिलिंद विद्यालयाचे शालेय गीत गाऊन करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांची जलजागृती रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अमित वानखडे, प्रशांत वानखडे, दिपक कावरे ,पुरणप्रकाश लव्हाळे ,अमोल बोबडे, मनिषा गावंडे, आनंद खंडारे, संजय आठवले ,दीपक रहाटे व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.