“आशा व गट प्रवर्तकांचे,१२ जानेवारीपासून आंदोलन सुरू… — सिंटू संघटनेतंर्गत आंदोलन सुरु…

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌ 

पारशिवनी : आरोग्य विभाग आशा व गट प्रवर्तक संघटना (सिंटू) यांच्या वतीने १२ जानेवारी रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला.

        पारशिवनी प्राथमिक आरोग्य केंद्र डोरली ,दहेगाव जोशी,साटक व नवेगाव खैरी येथील सुमारे दीडशे आशा वर्कर्स व प्रवर्तक यांचा पारशिवनी येथून व्हेरायटी चौक नागपूर येथे पोहोचले. 

          सिटुचे अध्यक्ष राजेंद साठे आणि पारशिवनीच्या सारिका लांजेवार,सरला निकोसे मोनिका गेडाम,रेखा पानतावणे व गीता बोदरे यांच्या नेतृत्वाखाली व्हेरायटी चौकात ठिय्या आंदोलन व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

           कारण आशा व गटप्रवर्तकांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी 23 दिवसांचा आदोलन केले होते.

        या आंदोलनाला अनुसरून आरोग्य मंत्र्यांनी गटप्रवर्तकांना 10, हजार रुपये आणि आशा वर्कर्सला 2, हजार रुपयांसह भाऊबीज म्हणून 7,000 रुपयांची वाढ जाहीर केली होती.

         परंतु आज पर्यंत आरोग्य मंत्रालयाने आश्वासनाला अनुसरून शासन आदेश काढलेला नाही.यानुसार शासनाने आदेश जारी करावेत,नाहीतर बुधवारी मागणीसाठी आजाद मैदान मुबई येथे मोर्चा काढणार असे सुतोवाच सोडले.

       तसेच राज्यभरासह नागपूर जिल्ह्यातील,पारशिवनी तालुक्यातील 150 आशा वर्कर्स व प्रवर्तकांनी शुक्रवारपासून पुन्हा बेमुदत संप पुकारून आंदोलन सुरू केले आहे.

          मोर्चाच्या रूपात धरणे आंदोलन करत आहेत.या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा सीटू संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद साठे करत असून,पारशिवनी तालुक्यातील सारिका लाजेवार, सरला निकोसे,मोनिका गेडाम,रेखा पानतावणे,गीता बोदरे यांच्यासह एकूण 50 आशा व प्रवटक 17 जानेवारीला सायंकाळी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार आहेत.

        अशी माहिती सारिका लाजेवार,सरला निकोसे,मोनिका गेडाम,रेखा पानतावणे,गीता बोदरे यांनी दिली.

**

     मागण्या..

(१) आशा व सुपरवायझर यांना ५ हजार दिवाळी बोनस द्या.

(२) गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायझर नामोल्लेख करण्यात यावा.

(३) आशा – सुपरवायझर यांना ऑनलाइन डाटा एन्ट्री सक्ती करू नये.

(४) आशा व सुपरवायझर यांना किमान वेतन देण्यात यावे.

(५) आशा सुपरवायझर यांना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे समायोजित करण्यात यावे.

(५) सी.एच.ओ.नसलेल्या सब सेंटर मधील आशा वर्करला आरोग्य वर्धिनीचा निधी मेडिकल ऑफिसरच्या सहीने देण्यात यावा.

(६) आशा सुपरवायझर यांना १५०० रु. महिना आरोग्य वर्धीनी निधी देण्यात यावा.

(७) शासकीय सुट्टीचे दिवशी लाभार्थीची माहिती मागवू नये.

(८) लाभार्थीची माहिती सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच मागवण्यात यावी. इतर वेळेस मॅसेज किंवा फोन करू नये.

(९) डेंग्यू,क्षयरोग,कुष्ठरोग कामाचा २०० रू.रोज देण्यात यावा.

        वरील मागण्यांसाठी पारशिवनी तालुकासह,जिल्हा व राज्यभर आदोलन सुरु केले आहे.