खल्लार पोलिस स्टेशन मध्ये तालुका विधी सेवा समितीच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम… 

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

         दर्यापूर तालुका विधी सेवा समितीच्या वतीने जनसामान्यात कायदेविषयक माहिती व्हावी म्हणून कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन पोलिस स्टेशन, खल्लार येथे करण्यात आले होते.

          व्यासपीठावर दिवाणी न्यायालयाचे वरिष्ठ स्तर न्यायाधिश पाटील, यादव, ठाणेदार रविंद्र बारड, दर्यापूर वकील संघांचे अध्यक्ष ऍड धर्मेंद्र आठवले, ऍड देवानंद पर्वतकर, ऍड विद्यासागर वानखडे, ऍड थर्डक,ऍड नळकांडे उपस्थित होते.

             प्रस्ताविक ऍड विज्ञासागर वानखडे यांनी केले सायबर कॅफे , महिलावरील अत्याचार, नविन कायदा जनतेच्या हिताचा, मूलभूत अधिकाराचे रक्षण करण्यास न्याय व्यवस्था सक्षम असल्याचे ऍड विद्यासागर वानखडे यांनी प्रास्ताविकातून सांगितले.

         ऍड थर्डक यांनी पोलिस आणि न्याय व्यवस्था नागरिकाच्या सोयीची असून खल्लार पोलिस कमी कर्मचाऱ्याच्या भरवशावर काम करीत आहेत.उत्पन्न कमी असलेलं वाम मार्गाचा वापर करीत असतो कोणताही माणूस गुन्हेगार नसतो परिस्थिती त्याला घडवित असते, काळानुसार बदलवा लागते चांगल्या गोष्टी स्वीकारत नाही वाईट लवकर स्वीकारतो पोलिसांसमोर अर्धसत्य येते त्याचे पूर्ण सत्य बाहेर काढावे लागते हवेतील चोऱ्या, मोबाईल बँकिंग असे मत मांडले.

             न्यायाधीश यादव यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेविषयक शिबीर घेण्यात येत असून गुन्ह्याचा अर्थ काय, कायदा असा विषय आहे तिथे सर्व विद्यार्थी असतो, गुन्हा म्हणजे संविधानला मान्य नाही, ज्यात दंड किंवा सजा तो म्हणजे गुन्हा,टेकनॉलॉजि माध्यमातून समाजात गुन्हा करुन भारतीय समाज व्यवस्थेत अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न, करणाऱ्यापासून जागरूक राहिले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.

             न्यायमूर्ती पाटील यांनी चांगल्या गोष्टी घ्या असे ओरडून सांगावे लागते वाईट गोष्टी घ्या असे ओरडून सांगावे लागत नाही, तळागाळापर्यंत कायदयाबद्दलची माहिती पोहचली पाहिजे हा सेवा समितीचा उद्देश आहे.

            सायबर गुन्हेगारी मोठया प्रमाणात वाढली आहे.लैगीक अत्याचार घटना, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, महिलांना तालुका विधी समिती मार्फत मोफत वकील, दर्यापूर न्यायालयात वकीलाची समाजिक बांधिलकी, समाजात व्यसनाला आळा घालणे जरुरी आहे असे विचार मांडले.

            या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड धर्मेद्र आठवले यांनी तर आभार प्रदर्शन ठाणेदार रविंद्र बारड यांनी केले.

           कार्यक्रमाला खल्लारचे सरपंच आरिफ शहा युनूस शहा, कसबेगव्हानचे सरपंच शशिकांत मंगळे,पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी,होमगार्ड पोलिस पाटील,उपस्थित होते.