राधेश्याम बाबा उत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

 धानोरा तालुक्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या लेखा या गावी राधेश्याम बाबा यांचे जत्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आली होती.

         ही जत्रा दिनांक 11 व 12 फरवरी रोजी पुण्यतिथी उत्सव समिती तर्फे आयोजित करण्यात आलेली होती. या यादरम्यान पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमांतर्गत दोन दिवसीय चालणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित झाले होते.

        धानोरा गडचिरोली रोडवर परमहंस राधेश्याम बाबा मंदिर परिसरात भाविक मोठ्या संख्येने दाखल झालेले होते.दरवर्षीप्रमाणे यंदाही राधेश्याम बाबा पुण्यतिथी उत्सव महासिद्ध यात्रा आयोजित केली जाते. या अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

           यामध्ये भजन कीर्तन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होते याचा आस्वाद भाविकांनी सुद्धा घेतला त्यामुळे वातावरण भक्तिमय प्रसन्नमय झाले होते.

        या कार्यक्रमात कवडू राकडे महाराज, मधुकर रामपूरकर, नानाजी तुपट,अध्यक्ष विनोद लेनगुरे,सुरेश मडावी, बाबुराव उईके,सुधीर जंजाळ, रमेश मैंद, महेश चिमूरकर,  गणेश कुळमेथे कार्यकर्ते व जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालय धानोरा येथील प्राचार्य डॉक्टर उदय थुल यांच्या मार्गदर्शनात प्राध्यापक विध्यार्थी यांनी दोन दिवसीय कार्यक्रमात आपली सेवा दिली.

        त्यांनी या परिसरातील संपूर्ण स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केला. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे पुण्यतिथी उत्सव व तथा महासिद्ध यात्रा च्या आयोजन कर्त्यांनी आभार मानलेत भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा आस्वाद घेतला.