
भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित धानोरा येथील श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालयात जीवनराव मुनघाटे यांची जयंती व पुण्यतिथी निमित्ताने दिनांक 16 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय थुल यांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून धानोरा येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालय सुरू करण्यात आले.
महाविद्यालयाला जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे हे नाव देण्यात आले व ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी साठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली असे विचार आपल्या अभिवादन पर महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.