महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 कलम 36 अन्वये मनाई आदेश जारी…

ऋषी सहारे 

   संपादक

गडचिरोली, : आगामी काळात गडचिरोली जिल्हयात दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ ते दिनांक ०७ मार्च २०२५ पर्यंत महाशिवरात्री यात्रा उत्सव भरणार आहे आणि महाशिवरात्री यात्रा उत्सव शांततेत पार पाहावे याकरीता गडचिरोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे.

         त्याअर्थी श्री. नीलोत्पल, पोलीस अधिक्षक, जिल्हा गडचिरोली यांना महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 का 36 प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पुढे नमूद केल्याप्रमाणे लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान करीत आहे.

          महाशिवरात्री यात्रा उत्सवाच्या ठिकाणी त्यातील लोकांचे वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार. महाशिवरात्री यात्रेत धार्मिक पुजा, स्थानाच्या जवळ लोकांचे वागणुकीबाबत निर्बंध घालण्याचे अधिकार.

           महाशिवरात्री यात्रा उत्सवाच्या ठिकाणी बाधा होणार याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानाचे जवळ लोकांचे वागणूकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार.

         महाशिवरात्री यात्रा उत्सव दरम्यान रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणे, ढोल ताशे वाजविणे इ. निर्बंध घालण्याचे अधिकार. महाशिवरात्री यात्रा उत्सव दरम्यान सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार.

         महाशिवरात्री यात्रा उत्सव दरम्यान सार्वजनिक ठिकाणी / रस्त्यावर लाउड स्पिकर वाजविण्यावर निबंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार. कलम 33,35, 37 ते 40, 42, 43 व 45 मुंबई पोलीस अधिनियमान्वये काढण्यात आलेला आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सुचना देण्याचे अधिकार.

       हा आदेश संपूर्ण गडचिरोली जिल्हा कार्यक्षेत्रात दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ चे ००.०१ वा. पासून ते दिनांक ०८ मार्च २०२५ चे २४.०० वा. पर्यंत लागू राहील.

          या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 134 प्रमाणे कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील. सदरचा आदेश पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्या सही शिक्क्यानिशी जारी केलेला आहे.