
ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, दि.१८: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत आवास योजना अंतर्गत प्रत्येकाला घर उपलब्ध व्हावे या उद्देशाने केंद्र शासनाकडुन व राज्य शासनाकडुन सदर योजना राबविण्यात येत असुन या योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्हयाला खुप मोठ्या प्रमाणात उदिष्टये प्राप्त झालेली आहेत.
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी आणि भौगोलिक दृष्टया खुप कठीण जिल्हा आहे. अशा परिस्थीतीत गडचिरोली जिल्हयातील दक्षिणभाग जिथे वाहतुक ही मोठी समस्या आहे अशा तालुक्यांना खुप मोठ्या प्रमाणात उदिष्टये प्राप्त झालेली आहेत.
1. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्हयाकरीता प्राप्त झालेले एकुण उदिष्टये 36956 त्यापैकी दक्षिणभागातील तालुक्यांना प्राप्त झालेली उदिष्टये अहेरी- 4684 भामरागड 522 एटापल्ली -2619 व सिरोंचा – 3344.
2. राज्य पुरस्कृत आवास योजना अंतर्गत जिल्हयाकरीता प्राप्त झालेले एकुण उदिष्टये 27158 त्यापैकी दक्षिणभागातील तालुक्यांना प्राप्त झालेली उदिष्टये अहेरी 2837, भामरागड -1422, एटापल्ली – 2198 व सिरोंचा – 1982 …
3. मोदी आवास योजना अंतर्गत जिल्हयाकरीता प्राप्त झालेले एकुण उदिष्टये 6548 त्यापैकी दक्षिण भागातील तालुक्यांना प्राप्त झालेली उदिष्टये अहेरी 421, भामरागड 16, एटापल्ली-85 व सिरोंचा – 237
4. पी.एम. जनमन अंतर्गत जिल्हयाकरीता प्राप्त झालेले एकुण उदिष्टये 8016 त्यापैकी दक्षिण भागातील तालुक्यांना प्राप्त झालेली उदिष्टये अहेरी 798 भामरागड 1106, एटापल्ली 3586, व सिरोंचा – 651
सदर उदिष्टये पूर्ण करण्याकरीता घरांचे बांधकाम करतांना लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्या भागातील उदिष्टये पुर्ण करणे खूप कठीण आहे.
दक्षिण भागातील अहेरी, भामरागड, एटापल्ली, आणि सिरोंचा या तालुक्यामध्ये घरे बांधण्याकरीता गवंडी सुध्दा मिळत नाही. त्यामुळे लाभार्थी स्वतःच्या घराकरीता स्वतःहुन विटा तयार करतात आणि घरे बांधतात. विटा तयार करण्यापासुन तर घरांचे बांधकाम पुर्ण करण्यापर्यंतचे काम हे लाभार्थ्यांनांच करावे लागत असल्यामुळे येथील घराचे बांधकाम पुर्ण करण्यास वेळ लागतो.
मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसीय कार्यक्रमांतर्गत शासनाकडुन जे 100 दिवसात पूर्ण करावयाचे उदिष्टये प्राप्त झालेले आहेत. त्या उदिष्टानुसार अपुर्ण घरकुले पुर्ण करण्याकरीता दक्षिण भागातील तालुक्याचे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक ग्रामीण गृहनिर्माण अभियंते व ऑपरेटर हे सुध्दा खुप कठोर परिश्रम करत आहेत. तसेच अहेरी तालुक्यातील सी.एल.एफ. ने कस्टम हायरिंग सेंटर साठी ट्रॅक्टर खरेदी केला आहे. जे वाळु वाहतुकीस मदत करीत आहेत.
अशाप्रकारे दक्षिण गडचिरोली भागातील लाभार्थ्यांपासुन तर प्रशासनापर्यंत शासनाकडुन प्राप्त झालेले उदिष्टये पुर्ण करण्याकरीता या सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत. असे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, गडचिरोली यांनी कळविले आहे.