जे एस पी एम महाविद्यालय धानोरा येथे तालुका स्तरीय शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षणाचे उदघाट्न… 

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

 जे एस पी महाविद्यालय धानोरा येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण २.० वर्ग दिनांक 17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.

          या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उदय थुल यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मंचावर प्राध्यापक कैलास खोब्रागडे, प्रा.टिकाराम धाकडे,भडके मॅडम, उपस्थित होत्या.

           या तीन दिवस प्रशिक्षण वर्गाला नरेंद्र कुंभारकर केंद्र प्रमुख, भडके मॅडम, रिसर्च पर्सन समीर भजे सुलभ हे प्रशिक्षण देणार आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत अभ्यासक्रम व विषय बदल याविषयी सविस्तर माहिती या प्रशिक्षण वर्गातून मिळणार आहेत.

         या तालुकास्तरीय प्रशिक्षण वर्गाला रांगी पेंढरी दुर्गापुर मुरूम गाव केंद्र समाविष्ट आहेत. या केंद्रातील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित राहणार आहे.