जे एस पी एम महाविद्यालय धानोरा येथे तीन दिवसीय अनिवासी शिबिर आयोजन… 

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

  जे एस पी एम महाविद्यालय धानोरा येथे तीन दिवसीय अनिवासी विशेष शिबिर दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आली.

         या अंतर्गत व्यक्तिमत्व विकास योजना शिबिराचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर उदय थुल हे होते, तर उद्घाटक प्रा. डॉ. राजू किरमिरे यांच्या हस्ते झाले.

        यावेळी मंचावर मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.गणेश चुधरी सर, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दामोदर झाडे, शिबिराचे समन्वयक प्रा.नितेश पुण्यप्रेड्डीवार उपस्थित होते.

          या उद्घाटन प्रा.डॉ.राजू किरमिरे यांनी व्यक्तिमत्व विकास भावना सामाजिक आचार विचार व आपले अंगी असलेल्या क्षमतेला गती देऊन आपल्यात सुधारणा केल्या पाहिजे तसेच व्यक्तिमत्व विकासाचे अनेक फायदे आहेत. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागते व त्याची जाणीव जागृती सुद्धा करता येईल असे मत व्यक्त केले.

         याप्रसंगी प्रा.डॉ.गणेश चुधरी यांनी मराठी भाषेला अभीचा दर्जा मिळाला पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.नितेश पुण्यप्रेड्डीवार यांनी केले.  कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रियंका पठाडे मॅडम यांनी केले, तर आभार डॉ.संजय मुरकुटे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.