
भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा येथील श्री साई बाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालय धानोरा दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचा उदघाट्न सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमती शालिनीताई रमेशचंद्र मुनघाटे तर उद्घाटक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जंगले यांच्या हस्ते पार पडले.
प्रमुख अतिथी म्हणून श्री सद्गुरू साईबाबा महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य डॉ. देवेंद्र माटे सर, प्राचार्य डॉ. उदय थुल,डॉ. पंकज चव्हाण, डॉ. डी बी झाडे, प्रा. गीताचंद्र भैसारे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. संजय मुरकुटे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख उपस्थित होते.
अरण्यदिप सांस्कृतिक समारंभाची सुरुवात संस्थेचे आराध्य दैवत श्री साईबाबा यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून दिपप्रज्वलाने करण्यात आली.यावेळी प्राचार्य डॉ. उदय थुल यांनी विद्यार्थ्यांनी जिद्द चीकाटि व परिश्रम घेऊन आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले प्रस्ताविक गीताचंद्र भैसारे कार्यक्रमाचे संचालन डॉ.गणेश चुधरी व आभार प्रदर्शन प्राध्यापक नितेश पुण्यप्रेड्डीवार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. किरमिरे सर, डॉ. जम्मेवार, प्रा.बनसोड,प्रा.तोंडरे, प्रा.वाडके, प्रा.धवनकर, प्रा. वटक मॅडम, प्रा.करमणकर, प्रा.रणदिवे, प्रा.आवारी, प्रा.धाकडे, प्रा.मांडवगडे, प्रा. बुरशे, प्रा.खोब्रागडे मॅडम, प्रा. मंडल उपस्थित होते.
तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी गोहणे, कायते, लांबट,ननावरे, बोनगीरवार,छाया चंदेल मेश्राम, निलेश स्वप्निल भंडारे, तुमराम मोहरले इत्यादी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.