युवा सांस्कृतीक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण…  — गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

भाविकदास करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी 

 धानोरा येथील श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे अरण्यादीप युवा सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा नुकताच महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडला.

         या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उदय थुल होते तर यावेळी माजी प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण साहेब, प्रा.डॉ.विना जंबेवार,डॉ.गणेश चुधरी, प्रा.डॉ. एच डी लांजेवार,प्रा.डी डी झाडे उपस्थित होते.

         क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धा व्हॉलीबॉल स्पर्धा कबड्डी स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा सांस्कृतिक विभागाच्या वतीने रांगोळी स्पर्धा ग्रंथ प्रदर्शन डिश डेकोरेशन गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या.

         स्पर्धकांना प्रथम,उपविजेता कार्यक्रमाचे पारितोषिक देऊन प्राचार्य डॉ. उदय स्थूल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक ज्ञानेश बनसोड यांनी केले तर आभार प्रशांत वाळके यांनी मानले यावेळेस विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.