जिल्हा चंद्रपूर
सिंदेवाही तालुका प्रतिनिधि
अमान क़ुरैशी
सिंदेवाही – लोनवाही चे अध्यक्ष व सचिव पदाकरिता निवडणूक शुक्रवारला तालेवार सभागृह येथे पहिल्यांदाच मतदान पद्धतीने संपन्न झाली. निवडणूक प्रक्रिया करिता ज्येष्ठ तसेच व्यापारी सभासद यांचे मतनाने संपन्न झाली.
शहरातील व्यापारी असोसिएशन सिंदेवाही लोनवाही च्या वतीने अध्यक्ष व सचिव पदाकरिता निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीकरिता अर्ज मागविण्यात आले होते. अध्यक्ष पदाकरिता दिलीप दुस्सावार व दीपक डेंगानी, सचिव पदाकरिता श्याम छत्रवाणी , अमोल सिद्धमशेट्टीवर, कालू मनवानी यांचे अर्ज दाखल झालेले होते. कालू मनवानी यांनी काही कारणास्तव अर्ज मागे घेतला. निवडणूक व आमसभा प्रक्रिये दरम्यान सभासदांचे मतदान करण्यात आले. व्यापारी असोसिएशन अध्यक्ष व सचिव पदा करिता व्यापारी सभासदांनी तालेवार सभागृहात मतदान केले. निवडणुकीचे मतदान प्रक्रियेत व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष दिलीप दुस्सावार व सचिव श्याम छत्रवाणी यांची मतदानाने निवड करण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रमाकरिता निर्णय अधिकारी वामन सोरते , प्रकाश गुंडावार ,अशोक भवानी ,कन्हैया टहलानी ,कलाम भाई ,राजू नरडे ,अजय कोलप्यकवर यांनी प्रक्रिया पार पाडली. आमसभा व निवडणूक प्रक्रियेचे सूत्रधार सुधीर कुडकेलवार, श्याम छत्रवाणी व आलोक सागरे आहेत. कार्यक्रमाचे संचालन ,प्रास्ताविक, कार्यप्रणालीच्या जबाबदारीने संदीप बांगडे यांनी आभार मार्गदर्शनपर माहितीसह उत्कृष्ट रितीने मतदान प्रक्रिया नियोजन केले. कार्यक्रमातील सभासदांनी स्नेहभोजननाचा आस्वाद घेतला. शहरातील व्यापारी असोसिएशनचे सभासद कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.