उप केंद्र शंकरपूर अंतर्गत विज बिल मुदतीच्या नंतर केल्या जातात वाटप…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

       म.रा.वि.वि.कंपनी उपकेंद्र शंकरपूर द्वारे विज बिल मुदत गेल्यानंतर वाटत असल्याचा गंभीर प्रकार शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी उजेडात आणला आहे.

            शंकरपूर उपसरपंच अशोक चौधरी यांनी कनिष्ठ अभियंता उपकेंद्र शंकरपूर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,मौजा शंकरपूर येथील वीज बिल मुदतीच्या नंतर वाटप करीत असून दिनांक १७/०१/२०२५ अजून पर्यंत शंकरपूर गावातील वीज ग्राहकांना वीज बिल आलेले नाही.

       काही बिलावर १५/०१/२०२५ रोजी पर्यंत भरणा केल्यास वाजवी रक्कम भरावी लागते,त्या तारखेच्या नंतर भरल्यास अतिरिक्त रक्कम भरावी लागते.१५ तारखेच्या आत वीज बिल मिळाले तर अतिरिक्त रकमेचा वीज ग्राहकांना भृदंड भरावा लागणार नाही.हा प्रकार दर महिन्याला चालत आहे.आज पर्यंत वीज ग्राहकावर झालेल्या अतिरिक्त रक्कम भरली आहे.याचा जबाबदार कोण आहे याची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाही करून आजपर्यंत वीज ग्राहकांनी अतिरिक्त भरलेली रक्कम वापस करावी अन्यथा वीज ग्राहकांना आपल्या म.रा.वि.वि.कंपनी उपकेंद्रासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.या संपूर्ण प्रकरणाची पुढील कारवाही करून कार्यवाही अहवाल द्याल असेही निवेदनात नमूद आहे.

           निवेदनाच्या प्रती ना.श्री देवेन्द्रजी फडणवीस मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री महाराष्ट्र राज्य,कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि. कंपनी वरोरा,उप कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि. कंपनी चिमूर यांना पाठविण्यात आल्या आहेत.